सातारा कडेपठारची खंडोबा यात्रा उत्साहात

औरंगाबाद,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सातारा येथील कडेपठार खंडोबा महाराजांची यात्रा व पालखी काढण्यात आली, या कडेपठार खंडोबा महाराजांची महाआरती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आली.

सातारा गावापासून जवळ असलेल्या कडेपठार येथील प्राचीन खंडोबा मंदिराची यात्रा रविवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी मागील वर्षीपेक्षा भाविकांची संख्या जास्त होती. कडेपठार येथील खंडोबा यात्रा पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी दरवर्षी भरते. यात्रेनिमित्त पालखी, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री क्षेत्र कडेपठारचा खंडोबा विश्वस्त मंडळ अध्यक्ष राजेंद्र जबिंदा, सहसचिव सिद्धांत  शिरसाट, उपाध्यक्ष रमेश बाहुले, सचिन सोमनाथ शिराने, कोषाध्यक्ष श्रीकांत मिश्रा, सदस्य विशाल धुमाळ, एकनाथ चिलघर यांच्या वतीने करण्यात आले होते.

Displaying WhatsApp Image 2022-01-23 at 7.19.09 PM.jpeg

तसेच आमदार संजय शिरसाट यांच्या माध्यमातून या क्षेत्रासाठी विविध विकास कामे देखील मंजूर झाले आहे, आमदार येत्या काही वर्षेभरात या कडेपठार मंदिराचा चेहरामोहरा बदलणार आहे. जेणे करून भाविक भक्तांना याठिकाणी आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येता येईल.

खंडोबाच्या असलेल्या १२ स्थानांपैकी सातवे स्थान हे श्री क्षेत्र खंडोबा कडेपठार आहे. हे ठिकाण सातारा गावापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा गावातील हेमाडपंती मंदिर बांधण्याआधीही मूळ मंदिर हे कडेपठार येथे आहे. सातारा गावातील खंडोबा मंदिरात आरती झाल्यानंतर सकाळी ९ वाजता पालखी निघून वाजतगाजत,‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत 11 वाजता कडेपठार येथे पोहोचली.  तेथे श्रींचा अभिषेक झाल्‍यानंतर नवीन वस्‍त्रे परिधान करण्‍यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  

यावेळी विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नरेंद्र जबिंदा, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, सरपंच गणेश वाघ, सुखदेव बनकर, बंडू वाघचौरे, संदीप देवरे, सुरेश बाहुले, संदीप रणजित ढेपे, कोसडीकर, ज्योतिराम पाटील, अजय चोपडे, मनोज सोनवणे, प्रवीण जाधव, सूरज शिंदे, अमर सभादिंडे, किरण देवकाते, आशिष दांडेकर, महेश थोरात, रणजित पवार,  संतोष जाटवे, मनोज धोपटे, गणेश देवकाते, कैलास पाटील तसेच मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.