पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवारी

औरंगाबाद,१३ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विवेकानंद ग्रुप ऑॅफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 15 रोजी समर्थ नगरातील विवेकानंद कला, सरदार दलीपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” व ““जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त” पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे सहायक आयुक्त सु.रा.वराडे यांनी कळविले आहे.

रोजगार मेळाव्यात मॅन एनर्जी सोल्यूशन इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, पॅरासन मशिनरी (1) प्रा.लि. औरंगाबाद, मायलन लॅबॉरेटरीज, औरंगाबाद, फॉर्ब्स ॲड कंपनी लि. औरंगाबाद,कॉस्मो फिल्म लि.औरंगाबाद, पगारिया ऑटो प्रा.लि. औरंगाबाद,कॅन पॅक इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, नवभारत फर्टीलायजर लि. औरंगाबाद, मराठवाडा ऑटो कॉम प्रा.लि. औरंगाबाद पित्ती इंजिनिअरिंग प्रा.लि.औरंगाबाद या  नामांकिंत उद्योजकांनी 231 पेक्षा अधिक पदे ऑनलाईन पद्धतीने अधिसूचित केलेली आहेत. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

           इंजिनिअरींग पदवी, पॉलिटेक्निक डिप्लोमा, आयटीआय तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर,  दहावी ,बारावी उतीर्ण उमेदवारांसाठी पदे अधिसूचित करण्यात आलेली आहेत.त्यामध्ये प्रत्यक्ष उमेदवार  सहभागी होऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकता.

           रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अर्ज करावे. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली नाही त्यांनी एम्प्लॉयमेण्ट टॅबवरील जॉब सीकर हा पर्याय निवडून नोंदणी करावी .

            संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अर्ज करताना काही अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  मेळाव्यासाठी अधिसूचित पदांची माहिती दररोज अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये प्राप्त होणाऱ्या रिक्त पदांना संकेतस्थळावर लॉग-इन होऊन अर्ज करावेत, असे आवाहनही वराडे यांनी केले आहे.