विभागीय आयुक्त कार्यालयात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष

औरंगाबाद:-  नैसर्गिक आपत्तीत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कार्य पार पाडण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांनी विभागीय नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

            नैसर्गिक आपत्तीसंबंधी विभागीय आयुक्त कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. संबांधितांनी नियंत्रण कक्षात उपस्थित राहून दूरध्वनी क्र. 2343164 यावर प्राप्त संदेश स्वीकारुन तत्काळ नोंदवहीत नोंदवावेत तसेच आवश्यक ती कार्यवाही पार पाडावी. महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, प्रादेशिक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक, इ मेल आदी माहिती अद्यावत ठेवावी, असेही आर्देशात नमूद करण्यात आलेले आहे.