शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

अन्नदान, ब्लँकेट वाटप, चारा वाटप, विविध विकासकामांचे लोकार्पण 

औरंगाबाद,१ जानेवारी /प्रतिनिधी:- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. मात्र सामाजिक बांधिलकी जपत घाटी व अनाथ आश्रम येथे अन्नदान, गरजूंना ब्लँकेट वाटप, गौशाळेत चारा वाटप, तसेच विविध विकासकामांचे लोकपर्ण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Displaying IMG-20220101-WA0302.jpg

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या निधीतून राजबाजार ते किराणा चावडी पर्यंत सिमेंट रस्त्यांच्या विकासकामाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी संस्थान गणपती राजाबाजार येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व आमदार प्रदीप जैस्वाल पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा करून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.

गंगापूर येथे ब्लँकेट वाटप

Displaying IMG-20220101-WA0289.jpg


शिवसेना नेते चंद्रकांत खैरे  यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना गंगापुरच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय गंगापुर येथे रुग्णांना जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अॅड हृषिकेश दिलीपराव धाट, शहर प्रमुख  अर्जुन कराळे पाटील, राजेंद्र शिंदे, रोहीत बेडवाल, स्वामी राजपूत, चिंटु जंगम, आकाश बुचुडे, प्रमोद कान्हे, प्रदीप टेमकर, मोहीत जोगदंड, कृष्णा निकम, धीरज गायकवाड, श्रेयश धाट, गौरव कपिले, प्रसाद उदावंत, कार्तिक उदावंत, तेजस देवळे व युवासैनिक उपस्थित होते.

Displaying IMG-20220101-WA0229.jpg


 जोहरीवाडा गोशाळेत गायींना चारा वाटप
 शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस एक जानेवारी रोजी कोरोनाच्या पार्श्व भुमीवर सर्व नियम पाळुन साधेपणाने साजरा करण्यात येत असुन, त्याच अनुषंगाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोणताही खंड न पडता श्री जय चतुर्थी प्रतिष्ठाण व शिवसेना गुलमंडी शाखेच्यावतीने जोहरीवाडा येथील गोशाळेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडु ओक यांच्या शुभ हस्ते गायींना चारा वाटप करण्यात आला.यावेळी शिवाजी शिंदे, छोटु गाडगे, शिवसेना शाखाप्रमुख सचिन ढोकरट, राजाबाजार शिवसेना शाखाप्रमुख रेवण सोनवणे, उपशाखाप्रमुख बंटी गुराले, हेमंत पालकर, उपविभागप्रमुख सचिन लखासे, योगेश मिसाळ, महेश घोंगते, हरीश अवसरमल, शिवसेना व्यापारी आघाडी उपशहरप्रमुख दिपक भाटी, अमोल गोसावी, मितेश थट्टेकर, हरिश बोंबले, शाखाप्रमुख संदिप हिरे, सचिन जगताप,सनी अभिजीत खैरे किरण झुंजरकर, रितेश जैस्वाल, अमोल खांडेकर, युवासेना गुलमंडी शाखाधिकारी युवराज झुंजरकर वैभव लकडे तसेच श्री जय चतुर्थी प्रतिष्ठाण व शिवसेना गुलमंडी शोखेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.