मन्याड धरणात जलसमाधी घेण्यासाठी जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षाला पोलिसांनी रोखले

Displaying IMG-20220101-WA0316.jpg

वैजापूर,१ जानेवारी /प्रतिनिधी :-अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक गटासाठी विनातारण कर्ज द्या अन्यथा मन्याड साठवण तलावात आत्मदहन करणार असा इशारा  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष विशाल शेळके यांनी व्यवस्थापकीय संचालक आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळातील मुंबई यांना एका निवेदनाद्वारे दिला होता.त्यानुसार श्री शेळके हे आज मन्याड  साठवण तलावात उडी घेऊन जलसमाधी घेण्यासाठी दुपारी 2.00 वाजता पोहचले असता  पोलिसांनी त्यांना अडवले व मागणी संदर्भात संबंधितांकडे पाठपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे श्री.शेळके यांनी आपला निर्णय मागे घेतला. 

परंतु लढाई अजून संपलेली नाही. यासाठी आठ दिवसाची मुदत आपण दिली असून न्याय न मिळाल्यास नामदेव भोसले  व्यवस्थापकीय संचालक  आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळातील मुंबई  यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करणार आहे. असे श्री.शेळके म्हणाले.याअगोदर राज्यातील  गटांना बिना तारण कर्ज दिले जात होते परंतु  शेतकऱ्यांनी गैरवहार न केल्यामुळे नवीन नियम श्री. भोसले यांनी काढला असून श्री. भोसले यांच्या आडमुठ्यापनामुळे राज्यातील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. मागील 6 महिन्यापासून राज्यातील प्रकरणे प्रलंबित असून या अगोदर गटांना दिलेल्या विनातारण कर्ज प्रमाणेच याही गटांना विनातारण कर्ज देण्यात यावे अशी मागणी विशाल शेळके यांनी केली आहे.निवेदनात श्री. शेळके यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हातील ज्या कंपन्याची पाहणी करून कामे पूर्ण झालेली आहे व महामंडळाकडून रितसर कार्यवाही करून करारनामा करण्यात आलेल्या कंपन्यांना मागील सहा महिन्यापासून कर्ज वाटप करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केले असून निधी उपलब्ध असूनही कर्ज वाटप करण्यात आलेले नाही.