‘जो काही निर्णय घेईल, तो ठामपणे घेईल, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणार नाही’; पंकजा मुंडे

“इथे वादळ येणार होतं, पण त्याची दिशा बदलली,”

‘अमित शहांशी चर्चा करणार’

परळी (बीड),​३ जून ​/ प्रतिनिधी :-मला जर भुमिका घ्यायची असेल तर असेच माध्यमांना बोलावून छातीठोकपणे बिंदास्त भुमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणारे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना मी विसवू देणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला इशारा दिला आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अनेक लोक निवडणुकांमध्ये हारले पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझनभर आमदार-खासदार झाले. गेल्या चार वर्षात मी मात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. माझ्या मनात गाढ विश्वास आहे. माझे नेते अमित शाह आहेत. त्यांची भेट घेणार आहे. त्यांना वेळ मागितला आहे. त्यांना मी विचारणार आता माझे वडील जिवंत नाही. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडला. त्यांच्याशी मी बोलणार आहे. हितचिंतक खूप आहेत. सगळ्याच पक्षात आहेत आणि दुसऱ्याही पक्षात आहेत. मी दररोज रडगाणं गाणारी नाही. बाप मेला तरी माझ्या डोळ्यात अश्रू येवू दिले नाही, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

19 वर्षांपासून मी राजकरणात आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत खूप अनोखे अनुभव आले. माझ्या मनात सतत शंका आली की माझ्या बोलण्याचे अर्थ वेगळे निघतील. गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित राजकारण करू शकणार नाही. ज्या दिवशी मी समोरच्या माणसाला आवडणार नाही, असे बोलणार नाही त्या दिवशी मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणून आज माझ्या पाठीमागे मीडिया आहे. मी त्यांचे आभार मानणार आहे. माझ्या माणसापर्यंत मीडिया योग्यच पोहोचवते. मी माझी भूमिका हजार वेळा मांडली. परत भुमिका मांडवी असे माझे लेचेपेचे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत. रामाने सोडलेला बाण परत येत नसतो तसे माझे शब्द आहेत. शब्द गोल फिरवायचे नाही.

मी राजकारणात आहे ते केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. मी माझ्या परिवाराचं भलं करण्यासाठी नाही. मी माझ्या स्वतःच्या कुठल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. मी लोकांसाठी आहे. माझ्या जीवनात नेहमी भूमिका घेतली आहे. लोक म्हणजे माझ्या आजूबाजूचे असणारे कार्यकर्ते नाही. जो माझ्याकडे बघतोय त्याचं हित मला दिसते. त्याच्यासाठी माझी भूमिका असणार आहे.

नामांतराची चळवळ, ओबीसी आरक्षणाची चळवळ या पक्षाच्या भूमिका नसताही मुंडे साहेबांनी यात स्वतःची आपली भूमिका घेतली होती. मराठा आरक्षण देण्यासाठी मुंडे साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळं भुमिका या समाज हिताच्या घ्यायच्या असतात. कुणाला आवडेल त्या भूमिका घेणारी व्यक्ती एखादेवेळी आमदारकी खासदारकी राज्यमंत्री मंत्रीपद घेऊ शकतो पण तो नेता होऊ शकत नाही. पंकजा मुंडे जी भूमिका घेईल ती छातीठोक पणे घेईल. आणि आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या त्याच्याशी प्रामाणिक राहील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

एकनाथ खडसेंबरोबरच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले होते. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. “इथे वादळ येणार होतं, पण त्याची दिशा बदलली,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

“कोणत्याही राजकारण्याला किंवा बलाढ्य नेत्याला निमंत्रण दिलं नाही. फक्त भजन किर्तन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. त्या नात्याने एकनाथ खडसे गडावर आले होतं. कारण, एकनाथ खडसे करोनात येऊ शकले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडेंचं सहकारी असल्याने दर्शनाला आले होते,” असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.“गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन होतं. मी वादळाची लेक आहे. इथे वादळ येणार होतं. मात्र, त्याची दिशा बदलली आहे. असं आमचं आयुष्य आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.