आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत गार्गी,सावरी,श्रावणी व भूश्रा बैग यांना प्रथम क्रमांक

औरंगाबाद,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:- महात्मा गांधी मिशन स्कूलच्या वतीने संस्थेच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवून शाळेच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये यशस्वीरित्या  झाली. या स्पर्धेत गार्गी,सावरी,श्रावणी व भूश्रा बैग यांना प्रथम क्रमांकयांनी आपापल्या गटात पहिला क्रमांक पटकाविला. 

या स्पर्धेत प्रसंगी डॉ. सुलेखा शर्मा, श्रीमती. उषा जाधव व श्रीमती. स्मिता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करून स्पर्धेचे सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे कला को-होर्टच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर नुकतीच शाळा उघडली व विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचे  वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेमध्ये एकूण 305 विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. ही स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली असून यामध्ये वर्ग पहिली ते बारावी व डी.एड चे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये संस्कार विद्यालय वाळूज, द एमजीएम स्कूल पडेगाव, क्लोवर डेल स्कूल,  संस्कार विद्यालय सिडको, संस्कार जुनियर कॉलेज व डीटी.एड कॉलेज सहभागी झाले होते.

 स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे

गट-अ (वर्ग पहिली  ते तिसरी) प्रथम- गार्गी शेडगे, द्वितीय- कार्तिकी पाथ्रीकर, तृतीय-रिया गलफाडे, उत्तेजनार्थ-अरुणभ खंडारे, गट –ब ( वर्ग ४थी ते ६वी) प्रथम-सावरी उनवणे, द्वितीय-ख़ुशी कुऱ्हाडे, तृतीय-विद्या पवार , उत्तेजनार्थ-अन्विषा भाटकर, गट-क (वर्ग ७वी ते १०वी)प्रथम- श्रावणी काकडे, द्वितीय-जान्हवी तुपे, तृतीय-किरण खुशवाह , उत्तेजनार्थ-शीतल धामणे ,गट-ड (वर्ग ११-१२वी व डीटीएड)प्रथम-भूश्रा बैग ,द्वितीय-शैख अंजुम तृतीय-शिवानी खाके व उत्तेजनार्थ-पंडित लीना

या विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून शाळेच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, उपसंचालिका डॉ .नम्रता जाजू, स्पर्धेचे परीक्षक एमजीएम फाईन आर्ट कॉलेजचे प्राचार्य देवीदास आगासे  यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व आकर्षक भेट देऊन गौरविण्यात आले .तसेच सर्व शाळेचे प्राचार्य श्रीमती मिता कपूर ,श्रीमती.सविता नरवडे,श्रीमती.परमिंदर कौर,श्रीमती. मल्लिका नायर,श्रीमती. सुवर्णा भोईर या बक्षीस वितरणप्रसंगी,शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कला कोहोर्ट प्रमुख विशाल भुसारे, कलाशिक्षक समाधानअंकुश, राज महाजन, नलिनी लोखंडे, वंदना कांबळे,श्रीमती.बच्छाव, अर्चना दाभाडे, सुरज शिंदे, शरद पवार व अनिल पोतदार आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संगीत शिक्षक श्री.संतोष धुमाळ यांनी केले