समथिंग गिव्ह बॅक टू सोसायटी ही लोकचळवळ उभा करण्याचा मानस

डॉ. हेडगेवार, धूत, कमलनयन बजाज रुग्णालयांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

औरंगाबाद,दि.30कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या संकटाचा वैज्ञानिक दृष्टीने सामना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुणवत्तापुर्वक काम करण्यावर आपला भर असून रुग्णालयांनी ‘आपण समाजाला परत देणे लागतो’ या भावनेतून या संकटकाळात रुग्णांवर उपचार करावे. ‘समथिंग गिव्ह बॅक टू सोसायटी’ ही लोकचळवळ, आरोग्यचळवळ औरंगाबाद जिल्ह्यात उभा करण्याचा आपला मानस असून त्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

कोरोनाच्या या संकटात रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेला पाठबळ व त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हेडगेवार हॉस्पिटल,धुत हॉस्पिटल आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलला सविस्तर भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अनिल भालेराव यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेल्या उपकरणांचे सुनील चव्हाण यांनी कौतुकही केले.

सर्व खासगी रुग्णांलयांना प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कोविड-19 (कोरोना) रुग्णांना ,गृहविलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधांची माहिती घेतली. तसेच रुग्णालयांनी उपचार सुविधांत आणखी वाढ करणे, लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. रुग्णालयांनी आपल्या स्टाफसह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मास्क वापरणे , शारिरीक अंतर ठेवणे, सतत हात धुणे ही या काळात जीवन पध्दती झाली पाहीजे आणि त्याव्दारे आपण कोरोनावर मात करु शकतो याबाबत ही प्रबोधनाचे काम करावे व त्याचे स्वत:ही पालन करावे, असे सांगितले. जिल्हयातील आरोग्य क्षेत्रात प्रगती करण्याबरोबरच जलसंधारण ,महिला सक्षमीकरण, उद्योगांसंबधी अडचणी तसेच दळणवळणाची साधने यामध्ये सुधारणा करण्यावर आपला भर असणार असल्याचेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.

हेडगेवार हॉस्पिटलमधील प्रत्येक वॉर्ड ला सुनील चव्हाण यांनी भेट दिली,कोविड वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा आणि लढण्यासाठी प्रोत्साहन दिल. पाहणीनंतर एका बैठकीत हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुपकरी यांनी जिल्हाधिकारी साहेबांची ‘ऍक्शन मॅन’ अशी ओळख करून दिली आणि आपल्या हॉस्पिटल्सच्या सुविधा त्यांच्या अडचणी आणि त्यांचे सल्ले कळवले.विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले जनकल्याण योजनेविषयी त्यांनी अडचणी व हवे असणारे बदल कळवले.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सरांनी सर्व डॉक्टरांशी आपुलकीचा संवाद साधून लवकरात लवकर ऍक्शन घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. हेडगेवार रुग्णालय,धूत रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, अलगीकरण कक्षास जिल्हाधिकारी यांनी भेट देत रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली तसेच कोरोना संक्रमीत रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद ही साधला. त्याचबरोबर रुग्णांना उपचाराच्या सेवासुविधा, आकारले जाणारे बील यांची माहिती घेतली. तसेच संबंधित रुग्णालयातील बिले तपासणी पथकांव्दारे बिले तपासणी अचुक करण्याची निर्देशही संबंधीतांना दिले. त्याचबरोबर रुग्णालयांच्या समस्या जाणून घेत डॉक्टरांवरील हल्ले होणे किंवा इतर काही अडचणी आहेत त्या सकारात्मकपणे सोडविण्यासाठी प्रशासन पाठीशी असलयाचे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, कोरोनाचे संकट रोखण्यात वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी तसेच संबंधीत अधिकारी, कर्मचारी अविरत काम करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.

यावेळी डॉ.हेडगेवार हॉस्पीटलचे दामुअण्णा दाते सभागृहात व्यवस्थापक श्री. भालेराव यांनी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .तर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते रुग्णालयातील डॉक्टर्स, वॉर्ड अधिकारी, लॅब टेक्नीशीयन, बीलींग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. चव्हाण यांनी रुग्णालयाव्दारे अतिदक्षता वार्डमध्ये उपचारासाठी कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या खाटांचीही पाहणी केली.

कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये भेट देऊन डॉ.नताशा आणि डॉ.मिलिंद वैष्णव यांच्या मदतीने कोविड आय.सी.यु. ची पाहणी केली आणि अडचणी जाणून घेतल्या.सुनील चव्हाण यांनी आय.सी.यु. आणि कोविड वॉर्डचे बेड वाढवण्याचे आदेश दिले आणि कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरमार्फत एक विशिष्ट वेळेला कौन्सिलिंग करण्यास सुचवले असता डॉ.नताशा यांनी सकारात्मकरीत्या त्याला प्रतिसाद दिला. यामध्ये होम आयसोलेशन आणि हॉटेल रेसिडेन्स आयसोलेशन विषयी मुख्यत्वे चर्चा झाली

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, तहसीलदार किशोर देशमुख, डॉ. हेडगेवार हॉस्पीटलचे संस्थापक डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, धूत हॉस्पीटलचे मुख्य प्रशासक डॉ. हिमांशु गुप्ता, कमलनयन बजाज रुग्णालयाच्या मुख्य प्रशासक डॉ. नताशा वर्मा, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे व्यवस्थापक अनिल भालेराव, नोडल अधिकारी , डॉ. सागर गुप्ता ,डॉ. गणेश शिंदे,धूत हॉस्पीटलचे डॉ.प्रसाद पुंदे, डॉ. रेणू बोराळकर, डॉ. वरुण गवळी, डॉ. राजमिलिंद पुदाळे, कमलनयन बजाजचे डॉ. मिलिंद वैष्णव, डॉ. करामत पठाण , बिले तपासणी पथक समन्वयक किरणकुमार धोत्रे व शिवाजी नाईकवाडे तसेच डॉ. शिवाजी भोसले आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *