वाळूज येथील खाम नदीवरील नवीन पूलासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आ.सतीश चव्हाण यांना आश्वासन

औरंगाबाद- वाळूज येथील खाम नदीवर नवीन पूलाच्या बांधकामासाठी येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आमदार सतीश चव्हाण यांना दिले.

May be an image of 3 people, people standing and indoor

          यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी आज  विधिमंडळात अशोक चव्हाण यांची भेट घेतली. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळूज येथील खाम नदीवरील पूल वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. वाळूज गावातील बहुतांश शेतकर्‍यांच्या जमिनी येथील खाम नदीच्या पलीकडे आहेत. वाळूज येथील स्मशानभूमी देखील तिकडेच आहे. तसेच आजूबाजूला इतर गावे असल्याने येथील नागरिक, शेतकर्‍यांना ये-जा करणार्‍यासाठी हा एकमेव मार्ग असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देत याठिकाणी नवीन पूलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग‘ही मागणी केली.

          आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करून सदरील पूलाच्या बांधकामासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे अशोक चव्हाण यांनी आ.सतीश चव्हाण यांना सांगितले.