शिवसेना स्थापनेपासूनच्या जेष्ठ शिवसैनिकांचा होणार सत्कार

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विशेष उपस्थिती

ध्वज दिवाळीनिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या संयोजनाने कृतज्ञता सोहळा

औरंगाबाद,१०नोव्हेंबर /प्रतिनिधी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवासेनाप्रमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वज दिवाळीनिमित्त शिवसेनाच्या वतीने जेष्ठ शिवसैनिक यांचा कृतज्ञाता सोहळ्याचे आयोजन केले आहे.   शुक्रवार, १२  नोव्हेंबर रोजी भानुदास चव्हाण सभागृहात सायंकाळी ६:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 

Displaying FB_IMG_1636534968133.jpg

 हा कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटात जाहीर कार्यक्रम बंद होते. मात्र अनेकदा ऑनलाईन बैठका, चर्चा होत गेल्या आहेत. तरी जुन्या सहकारी व मित्रपरिवार यांचे नवे जुने कार्यकर्ते यांची ओळख व्हावी. स्नेहमिलन व प्रत्यक्ष आपुलकीने भेट व्हावी, या प्रांजल उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची भावना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास कोरोना नियमांचे पालन करून आसन व्यवस्था तयार केली आहे.  या पारिवारिक कार्यक्रमास रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार रमेश बोरणारे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा समनव्यक कला ओझा, जिल्हासंघटक राखी परदेशी, प्रतिभा जगताप आदींची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजू राठोड, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे तमाम शिवसैनिक व युवासैनिक आणि महिला आघाडी व सर्व अंगीकृत पदाधिकारी यांनी केले आहे.