कोरोना संकटातही पत्रकारांनी शोधल्या रोजगाराच्या नव्या वाटा-वसंत मुंडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या स्नेहमिलन कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

औरंगाबाद,१०नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कोरोना महामारी टाळेबंदीचा माध्यम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असला तरी शहरासह ग्रामीण भागातील तरुण पत्रकारांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करत दर्जेदार ऑनलाईन दैनिके, वेब साईटस, न्युज पोर्टल, यु ट्युब चॅनल्स काढून रोजगाराच्या नव्या वाटा शोधल्या. दर्जेदार लिखाण आणि संपर्क यातून अनेकांनी स्वतःबरोबर इतरांनाही काम देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठे माध्यम समुह खर्च कमी करण्यासाठी पत्रकारांना नोकरीवरुन काढत असताना तरुण पत्रकारांनी मात्र तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करत आपले रोजगार निर्माण केले. त्यामुळे संकट नेहमी नवी संधी निर्माण करते हेच यातुन सिध्द झाले असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.

Displaying 2.jpg

औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन मंगळवार रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या उपस्थितील रात्री उशिरापर्यंत चालले. पत्रकार संघाच्या स्नेहमिलनाला आमदार अतुल सावे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे , भाजपचे मधुर अग्रवाल, सुनिल सानप, शिवसेनेचे संतोष मोरे, राजेंद्र पाटील, काँग्रेसचे सदानंद जाधव, दिपक गायकवाड, संजय निकम, उद्योजक रामकृष्ण थोरात, सीए अमित बगाडिया, कवि प्रा. ज्ञानेश्‍वर कुलकर्णी, लेखक निवेदक श्रावण गिरी, कवयित्री कस्तुरी कुलकर्णी, गझलकार गिरीश जोशी, कवी चक्रधर कोठी, सुनिल उबाळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, संपादक आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

Displaying 3.jpg

ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना वसंत मुंडे म्हणाले, कोरोना महामारीमुळे वृत्तपत्र क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे मोठ्या वृत्तसमुहांनी पत्रकारांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. तर छोट्या वृत्तपत्रांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असताना तरुण पत्रकारांनी मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करुन आपल्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे संकट हे संधीही घेऊन येते हे स्पष्ट झाले आहे. अनेकांनी घरी बसून केवळ एका मोबाईल या साधनाचा उपयोग करुन दर्जेदार दैनिक, ऑनलाईन वेबसाईटस, न्युज पोर्टल, युट्युब चॅनल काढून गुगलकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले आहेत. वृत्तपत्रात काही हजारात काम करणार्‍या पत्रकारांनी युट्युबच्या माध्यमातून लाखात उत्पन्न उभे केले आहे. त्यामुळे करोनाच्या संकटात माध्यम क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या असुन अनेकांना रोजगाराच्या नव्या वाटा सापडल्या आहेत. दोन वर्ष करोनामुळे प्रत्यक्ष भेट शक्य न झाल्यामुळे स्नेह मिलनाच्या निमित्ताने संवाद आनंददायी झाला आहे. सर्वधर्म, पक्ष, पंथ व विचारांचे लोक एकत्र आल्यामुळे नैराश्याच्या वातावरणातून नवी उभारी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आयोजक पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शांताराम मगर, महानगर अध्यक्ष अनिल सावंत, संपादक छबुराव ताके, मुकेश मुंदडा, मनोज पाटणी, संजय व्यापारी, रसपालसिंग अट्टल, शिवानंद चक्करवार, अभय विखणकर, आर.के.भराड, सोमनाथ शिंदे, शिवाजी आस्वार, आरेफ देशमुख, शेख अमीर, राहुल मुळे, गणेश गाडेकर, ज्ञानेश्‍वर तांबे, अनिस कुरेशी, सिद्धार्थ मगर, शेख जावेद अहेमद, सिद्धार्थ वाहुळे, ज्ञानेश्‍वर बावने, आदित्य बरांडे आदिंची उपस्थिती होती.

Displaying 4.jpg


दिवाळी अंकांचे प्रकाशन

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते यावेळी आधुनिक केसरी, देवगिरी वृत्त, आत्ताच एक्सप्रेस या दैनिकांच्या दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्यात आले.