कौटुंबिक न्‍यायालयात दुभंगलेले १९ संसार पुन्हा जुळली

औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  क्षुल्लक कारणांवरून झालेले समज-गैरसमज, पैशांचा तगादा, सासरच्यांकडून होणारा त्रास, अशा काही कारणांमुळे दुभंगलेले १९ संसार पुन्हा जुळली. कौटुंबिक  न्‍यायालयात ठेवण्‍यात आलेल्या ३९ प्रकरणांपैकी २२ प्रकरणांची तडजोड होऊन ती निकाली निघाली. तर १७ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले. ही प्रकरणे शनिवार दि.११ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आली.

राष्‍ट्रीय लोकअदालतीच्‍या पॅनल क्रं.१६ वर पॅनल प्रमुख म्हणुन जिल्हा न्‍यायाधीश एस.जे. रामगढीया यांनी तर विधिज्ञ एस.के. बरलोटा यांनी सदस्य म्हणून तर संध्‍या चव्‍हाण आणि ज्योती सपकाळे यांनी समुपदेशक म्हणुन काम पाहिले. राष्‍ट्रीय लोकअदालत प्रभारी प्रमुख एस.ए. सिन्‍हा यांच्‍या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोकअदालतीसाठी प्रबंधक अनिल जाधव, प्रभारी अधिक्षक अमोल खोत आणि कौटूंबिक न्‍यायालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले