वैजापूर येथे ई-श्रम कार्ड व विविध योजनांसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचे वाटप

वैजापूर,२७ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील गोरगरीब, दीन-दुबळे, निराधार व मागासवर्गीय नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणून

आवश्यक ई-श्रम कार्ड, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड व नवीन शिधा पत्रिका इत्यादी आवश्यक प्रमाण पत्र मोफत वाटप कार्यक्रम रविवारी (ता.25) येथे पार पडला. 

येथील संत सेना महाराज कार्यालयात प्रभाग सहामधील रहिवाशीसोनू राजपूत व ई,सेवा सुविधाकेंद्राचे प्रमुख गोरख मापारी यांनी यात पुढाकार घेतला. नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी व जेष्ठ नागरिक तथा साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांच्याहस्ते हे कार्ड या प्रभागातील गोरगरीब व मागासवर्गीय नागरिकांना वाटप करण्यात आले.

राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनासाठी या कार्डचा लाभ होणार आहे त्यामुळे त्याचा योग्य वापर करून सांभाळून ठेवावे.असे आवाहन ठाकूर यांनी केले. जवळपास चारशेच्या वर नागरिकांना हे सर्व कार्ड मोफत तयार करुन देण्यात आले, या प्रभागाचे सोनू राजपूत व गोरख मापारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. या कामात त्यांना फरहान शेख

राहुल त्रिभुवन, सागर त्रिभुवन, अमोल राजपूत,सुरेश आंबेकर,किरण दाढे, करणं शिंदे यांनी सहकार्य केले. नगरसेवक गणेश खैरे, रघुनाथ जाधव, ज्ञानेश्वर सिरसाट यांची उपस्थिती होती. शेवटी सोनू राजपूत यांनी आभार मानले.