वैजापूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राजीव डोंगरे

वैजापूर,२७ डिसेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रीय स्तरावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावैजापूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड सोमवारी (ता.26) करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.राजीव डोंगरे यांची तर सचिवपदी डॉ. सुहास रहाणे यांची निवड करण्यात आली.

असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. एस.एम.जोशी व सचिव डॉ. सुभाष शेळके यांच्या उपस्थितीत शहरातील डॉक्टर्सची बैठक होऊन असोसिएशनची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. 

सचिव- डॉ. सुहास राहणे

निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी – अध्यक्ष – डॉ. राजीव डोंगरे, उपाध्यक्ष – डॉ.चैतन तांबे, सचिव- डॉ. सुहास राहणे, सहसचिव- डॉ.सचिन राजपूत, कोषाध्यक्ष – डॉ. जयसिंह मरमट कार्यकारिणी सदस्य-डॉ. एम.एन.मुन्शी व डॉ.कविता शेळके

डॉ.सचिन राजपूत
डॉ.चैतन तांबे

असोसिएशनची सदरील शाखा ही राष्ट्रीय पातळीवरील मुख्य शाखेशी सलग्न असून या शाखे मार्फत राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांच्या समस्या सोडविणे,  व्यवसाय नोंदणी व नूतनीकरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्यावत वैद्यकीय मार्गदर्शन, शासनाच्या नियमांचे पालन, डॉक्टर वर्गाला अद्यावत  वैद्यकीय ज्ञान माहिती देणे, चर्चात्मक वैद्यकीय परिषद आयोजित करणे, सातत्यपूर्ण वैद्यकीय मार्गदर्शन करणे, सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा स्पर्धा, वैद्यकीय कॅम्प आयौजित करून अहवाल आयएमएच्या मुख्य शाखेला सादर करणे इत्यादी कार्य या शाखेमार्फत घेणार असल्याचे डॉ. राजीव डोंगरे यांनी सांगितले.