वैजापूर शहरात संत रोहिदास यांची जयंती उत्साहात साजरी

वैजापूर ,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर शहरातील इंदिरानगर-दुर्गानगर भागातील संत रविदास ग्रुपच्यावतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची 645 वी जयंती आज (ता.16) उत्साहात साजरी करण्यात आली.

मिरवणूक व इतर कार्यक्रम न करता भाविकांना महाप्रसाद देऊन व संत रविदास महाराज यांचे विचार समाजात पोहचवावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक डॉ. दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी उपस्थित बंधू भगिनींना संत रविदास महाराज यांच्या समाज कार्यातील महत्वाचे पैलू उपदेशीत केले. नगरसेवक दशरथ बनकर, दिनेश राजपूत व प्रा.बी.एन.भगोरे यांनी आपले विचार मांडले.

सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रास्ताविक केले. दिनेश राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी नगरसेवक गणेश खैरे, राजेश गायकवाड, नगरसेविका जयश्री राजपूत.पी.एन.पोटे, किशोर प्रसाद, विजय लोधे, अशोक लोधे, श्यामलाल डोरणे, लालचंद पवार, मानसिंग लोधे, संतोष प्रसाद,अमरचंद लोधे, सरबाजीत पंजाबी, अजय लोधे, सचिन पोटे, सुमन पवार, गीता प्रसाद, लक्ष्मी लोधे, संगीता जोनवाल, मैना लोधे, रेखा प्रसाद, शंकरदादा शेळके, चंद्रसेन भोसले, राजू लोधे, भाजप युवा मोर्चाचे महेश भालेराव, बी वाय.त्रिभुवन, शैलेश पोंदे, सागर भाटे, बी.एम.चव्हाण आदी उपस्थित होते.