वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतमध्ये 442 प्रकरणे निकाली

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत विवाद पुर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी 342 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन विविध विभागांची सुमारे प्रलंबित प्रकरणात 5 कोटी 03 लाख 01हजार 409 रुपयांची तर प्रलंबित प्रकरणात 5 कोटी 76 लाख 77 हजार 262 रुपयांची वसुली करण्यात आली. 

जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी लोक अदालतीचे उदघाटन केले. न्यायाधीश डी.एम.आहेर, न्यायाधीश पी.पी.मुळे, न्यायाधीश आर.एम.नेर्लेकर न्यायाधीश आर. एम. कराडे, न्यायाधीश श्रीमती एस. के. खान, न्यायाधीश श्रीमती डी. एम. पवार यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. वकील संघाचे अध्यक्ष अँड. किरण त्रिभुवन यांची उपस्थिती होती. या लोक अदालतमध्ये प्रलंबित असलेल्या पैकी 442 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीसाठी वकील संघ सहकारी सोसायटीचे चेअरमन अँड. सोपान पवार, अँड. आर. डी. थोट, अँड. रामकृष्ण बोडखे, अँड. व्ही. जी. वाघ, सचिव अँड. वैभव ढगे, अँड. राजेंद्र शिंदे, अँड. मजहर बेग, प्रदीप बत्तासे, अँड. संतोष जेजुरकर, अँड. कुंजीर, अँड. रविराज शिंदे, अँड राफे हसन, अँड. के. एस. गंडे, अँड. सचिन दहिभाते, अँड. सविता पाटणी,अँड. सय्यद नुजहत, अँड.ज्योती शिंदे कापसे, अँड. माया जाधव, अँड. आर. डी. सिरसाठ, अँड. नवनाथ गायकवाड, अँड. संदीप डोंगरे, अँड. सचिन जानेफळकर, अँड. नितीन बोराडे, अँड. निखील हरिदास, अँड. संदीप कटारे, अँड. प्रफुल्ल पोंदे, अँड.   कुणाल हरिदास, अँड. आकाश ठोळे, अँड. जावेद बेग, अँड. रमेश सावंत, अँड. राहूल धनाड, अँड. भाग्यवंत,अँड. दत्तात्रय जाधव व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.