वैजापूरनजीक नागपूर-मुंबई महामार्गावर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

वैजापूर, १३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-शहराजवळील नागपूर – मुंबई हायवे परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणा-या दोन संशयितांना वैजापूर पोलिसांनी शनिवारी (ता.12) सायंकाळी अटक केली. अविनाश ऊर्फ शेखर महादू महाले (वय 29 रा. होळी चौक, मेहुणे ता. मालेगाव जि.नाशिक हल्ली मुक्काम कलेक्टर पट्टा विंग नंबर 156 फ्लँट नंबर 3 निसर्ग हाॅटेलचे मागे मालेगाव), जयेश लोटन मिसाळ (वय 20 रा. कवळाणे काळेवाडी वस्ती ता. मालेगाव जि. नाशिक) असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. 

आरोपींकडे गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी पोलीस पथकासह नागपूर – मुंबई महामार्गावर शोध घेतला असता रस्त्याचे कडेला दोन्ही संशयित एक्स.यु.व्ही. क्रमांक एम.एच.18 ए. जी.1717 मध्ये बसलेले होते. पोलीसांनी त्यांची विचारपूस केली मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांची अंगझडती घेतली तेंव्हा त्यांच्याकडे गावठी पिस्तुल आढळून आले. दरम्यान हायवे जवळील पेट्रोल पंप परिसरात नेमके ते कोणाचे वाट पहात थांबले होते. याचे गूढ उकलून काढण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून पिस्तुलासह 8 लाख 50 रुपये किंमतीची  एक्स यु व्ही कार क्रंमाक एम. एच. 18 ए.जी. 1717 जप्त केली. सदर वाहन हे मालेगाव तालुक्यातील येसगाव खुर्द येथील परमेश्वर बारकू शेलार यांचे नावे असल्याची कागदपत्रावरून आढळून आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे करत आहेत.