बोरसर सर्कलमधील 70 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे आ.अंबादास दानवे यांच्याहस्ते भूमीपूजन

वैजापूर,१६ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील बोरसर सर्कलमध्ये आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने विविध विकास कामासाठी 70 रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या विकास कामांचे भूमीपूजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले.

Displaying FB_IMG_1639650131931.jpg

स्थानिक विकास निधी व जिल्हा परिषद वार्षिक योजना ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत वैजापूर  तालुक्यातील बायगांव येथे राज्यमार्ग 26 ते बायगांव रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण (20 लक्ष रुपये),बाभूळगांव ते लाखणी रास्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (20 लक्ष रुपये), वाघला रस्ता मजबुतीकरण (20लक्ष रुपये) व भटाणा येथील मारुती मंदिर सभामंडप (20 लक्ष रुपये ) अशा एकूण 70 लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमीपूजन आ.अंबादास दानवे यांच्याहस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. रमेश पाटील बोरणारे होते तर मा.नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हापरिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,तालुकाप्रमुख सचिन वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे, मा.नगराध्यक्ष साबेर खान आदींची समयोचित भाषणे झाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, पार्वतीबाई जाधव, जे.के.जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणमामा गायकवाड, अंकुश पाटील हिंगे, बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, वर्षाताई जाधव, लता पगारे, मोहनराव साळुंके, गोरख शिंदे, कारभारी सरोवर, गोरख पाटील आहेर, भाऊसाहेब पाटील गलांडे, सलीम वैजापुरी, बाळासाहेब जाधव, डॉ. निलेश भाटिया, राजेंद्र पाटील चव्हाण, प्रभाकर जाधव, युवासेनेचे श्रीकांत साळुंके, नंदकिशोर जाधव , अंबादास खोसे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.