स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावं -डॉ. अरुणा कराड

औरंगाबाद,३१ऑक्टोबर /प्रतिनिधी:-महिलांमध्ये वाढणाऱ्या स्तनाच्या कर्करोगासंदर्भात महिलांमध्ये आणि समाजात जागृती व्हावी या हेतूने सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता एम.जी.एम हॉस्पिटलच्या कर्करोग विभागाच्या प्रमुख आणि स्तन कर्करोग तज्ज्ञ डॉ. अरुणा कराड यांनी स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावं यासाठी महिलांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं तपासावे या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
विमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. हरबीन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षा श्रेया शेट्टी ( कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि अडव्होकसी कौन्सिल) यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात   ब्रेस्ट कॅन्सर दीन निमित्त  शी – फॉर – शी मोहिम अंतर्गत “स्तन कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शी – फॉर – शी मोहिम  ही  महिलांनासाठी प्रोत्साहनवर्धक  तसेच महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण करण्याच्या हेतूने निर्माण केलेली महिलांची राष्ट्रीय चळवळ आहे.  या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत महिला उपस्थित होत्या.
यावेळी  उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी महिलांच्या आरोग्यचे महत्व पटवून दिले.तसेच कर्करोगा सारख्या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्या डॉ. मंगला वैष्णव आणि वैद्यलता जाधव यांचा वुमन बिसनेस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या  वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डब्लूआयसीसीआय  नॅशनल कोन्सिल टीमच्या आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके, छाया देवराज, सयेदा फिरसात, जयश्री श्रीवास्तव, पूजा जोशी उपस्थित होत्या.