शिवसेनेच्या वतीने दिवाळी निमित्त​ ​नाविन्यपुर्ण उपक्रमाचे​ ​आयोजन

पन्नास हजार​ ​घरांवर  भगवे ध्वज लावण्याचा संकल्प

औरंगाबाद,३०ऑक्टोबर /प्रतिनिधी:- शिवसेना  सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते,याच उपक्रमाचा भाग म्हणुन दिपावली निमित्त नावि​न्य​पुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात ​येणार आहे. यात ​  ध्वज दिवाळी अभियान राबविणार असुन  पन्नास हजार​ ​घरांवर  भगवे ध्वज लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  ​१ ते ३ ​ नोव्हेंबर रोजी हे उपक्रम ​होणार आहेत. ​

4 नोव्हेंबर दिपावलीच्या भल्या पहाटे शासकीय वैद्यकिय ,महाविद्यालय  ( घाटी ) परीसरात रुग्णांच्या नातेवाईकासाठी सकाळी 5 ते 7 या वेळात अभ्यंगस्नान  आयोजीलेले आहे. शिवसेनेच्या वतीने यावेळी गरम पाणी , उटणे , साबनाने अभ्यंगस्नान घातले जाईल.

5 नोव्हेंबरला शिवसेना  ठिकठिकाणी आकाश दिव्याच्या धर्तीवर  ‘विकास दिप’ लावतील चौकाचौकात ​औरंगाबाद शहरात ​होत असलेला व होणा-या  विकासाबाबतीत उद्घोषण असतील असे 200 ‘ विकास दिप ‘ ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे.

6 आणि 7 नोव्हेंबर रोजी महिला आघाडीच्या वतीने भाऊबीज साजरी केली जाणार ती प्रामुख्याने कोरोनायोध्द्या सोबत त्यात वैद्यकिय महाविद्यालयातील  वैद्यकिय सहाय्यक (कंपाऊंडर ) यांना भेट वस्तु देवुन ओवाळले जाईल. त्याचबरोबर 7 नोव्हेंबर रोजी  शहरातील 33 स्मशानभुमी मध्ये अविरत सेवा देणारे स्मशानजोगी व त्यांचे ​कुटूंबियां​सोबत भाऊबीज करुन त्यांना भेटवस्तु व साडीचोळी  कपडे भेट देण्यात येणार आहे. 

7 नोव्हेंबरलाच बीडबाय पास फटाका मार्केट, टि व्ही सेंटर  येथिल  छत्रपती संभाजी महाराज मैदान , नारळीबाग, पावण गणपती मंदिर  परिसर याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी किल्ले बनवा स्पर्धा  घेण्यात येणार आहे.14 नोव्हेंबर​ ​रोजी तापडीया नाट्य मंदिर येथे ‘ मी सावरकर बोलतोय ‘  या नाटकाच्या प्रयोगाचेही आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे​,​ आमदार संजय शिरसाट​,​ आमदार प्रदीप जैस्वाल ​,​माजी महापौर नंदकुमार घोडेले​,​ उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर​,​ राजू राठोड​,​ अशोक शिंदे​,​ शहरप्रमुख विजय वाघचौरे​,​ बाळासाहेब थोरात​,​ विश्वनाथ स्वामी​,​ बाबासाहेब डांगे​,​ विधानसभा संघटक राजू वैद्य ​,​माजी सभागृहनेता विकास जैन​,​ तालुकाप्रमुख राजू वरकड​,​ केतन काजे​,​ महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार​,​ जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.औरंगाबाद,३०ऑक्टोबर /प्रतिनिधी:-