औरंगाबादमध्ये सोमवारी महिला सरपंच परिषद

औरंगाबाद,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-

राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रात महिला अतिशय प्रभावीपणे काम करताना आपण पाहत आहोत यापुढेही महिलांनी राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्य करण्याच्या, नेतृत्व गुण वाढवण्याच्या व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने औरंगाबादमध्ये  महिला सरपंच परिषदेचे आयोजन 8 नोव्हेंबर ,सोमवार रोजी सकाळी 9:30 वाजता तापडिया नाट्यमंदिर , निराला बाजार ,औरंगाबाद याठिकाणी करण्यात आले असल्याचे संयोजक आमदार अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य आमदार मनीषा कायंदे यांनी कळविले आहे.

या सरपंच महिला परिषदेचे उद्घाटन व मार्गदर्शन

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे ,उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई ,रोहयो व फलोत्पादन मंत्री आमदार संदिपान भुमरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, ग्रामविकास व महसूल मंत्री अब्दुल सत्तार करणार आहे.

 सदरील सरपंच परिषद तीन सत्रात होणार असून विविध विषयांवर यात “ग्राम विकास मध्ये सरपंचांची भूमिका” या विषयावर उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर भारतआप्पा पाटील, “आमचे गाव आमचा विकास” या विषयावर उपसंचालक बी एम वराळे, “जलजीवन मिशन एक मिशन” या विषयावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संचालक अजय सिंह, “नानाजी देशमुख संजीवनी योजना” या विषयावर जिल्हा कृषी अधिकारी पी आर देशमुख, “ग्रामपंचायत आर्थिक स्त्रोत व बळकटीकरण” या विषयावर आदर्श गाव पाटोदा चे माजी सरपंच भास्करराव पेरे ,”लोकसहभागातून विकास” या विषयावर वाहेगावच्या सरपंच वैशाली अशोक शिंदे हे वक्ते आपले मनोगत व्यक्त करणार असून या कार्यक्रमास *आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरणारे ,आमदार उदयसिंह राजपूत ,यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

या सरपंच महिला परिषदेस जिल्ह्यातील सर्व महिला सरपंच ,उपसरपंच ,आजी माजी सरपंच यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटाने, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड ,शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे ,समाज कल्याण सभापती मोनाली राठोड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे ,महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी केले आहे.