आरोग्य विभाग भरती प्रक्रिया: सार्वजनिक सेवा गट ‘क’ पदभरतीची परीक्षासठी प्रशासनाची तयारी पूर्ण

·         दोन सत्रात परीक्षा, 63 शाळा परीक्षा केंद्र म्हणून अधिग्रहित

·        कोविड प्रतिबंधात्मक पद्धतीने परीक्षेचे आयोजन  

औरंगाबाद,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास 100 टक्के रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसरुन आरोग्य विभागाचे भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मे. न्यासा कम्युनिकेशन यांची नेमणूक केलेली आहे.

            शासनाच्या परवानगी नूसार गट क मधील औरंगाबाद मंडळातील 22 संवर्गातील 160 रिक्त पदे भरण्यासाठी  5 ऑगस्ट 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्सास अनुसरुन 30908 अर्ज प्राप्त झाले. याबाबत परीक्षा . न्यासा यांच्या मार्फत्‍ 24 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सदरील भरतीमध्ये 22 संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे उपसंचालक, आरोग्य सेवा औरंगाबाद मंडळ हे आहेत. तसेच सदर परीक्षेसाठी नोडल अधिकरी म्हणून डॉ. मनोहर वाकळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद यांची निवड केलेली आहे.

            सदरील परीक्षा ही 24 ऑक्टोबर 2021 रोजी दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आली असून त्यासाठी एकंदरीत 63 शाळा परीक्षा केंद्र म्हणून अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. सदर परिक्षेसाठी पर्यवेक्षक व समवेक्षक यांच्या नेमणूक संबंधित संस्थेने केल्या असून प्रत्येक शाळेसाठी पर्यवेक्षत व दिव्यांग उमेदवारासाठी लेखनिकांच्या नेमणूक ह्या जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय औरंगाबाद यांनी केलेल्या आहेत.

            या परीक्षा ही पारदर्शकपणे पार पाडण्याकरीता प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हीडीओ शुटींग, पोलीस बंदोस्त, जॅमर ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर व सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, असे डॉ. प्रदीप कुलकर्णी जिल्हा शल्य चिकित्सक, जिलहा रुग्णालय, औरंगाबाद यांनी कळविले आहे.