देशव्यापी लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत 101 कोटी 30 लाख लसींच्या मात्रा

गेल्या 24 तासांत 68 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा

गेल्या 24 तासांत 16326 नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली, २३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गेल्या 24 तासात  देशभरात 68,48,417 लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून  आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा पार करत एकूण 101 कोटी 30 लाख लसींच्या मात्रा (1,01,30,28,411) दिल्या आहेत. 1,00,29,602 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 17,677 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या प्रारंभापासून) 3,35,32,126 इतकी झाली आहे.

परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.16% आहे. हा दर सध्या मार्च 2020 पासूनच सर्वाधिक दर आहे.केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 118 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे.गेल्या 24 तासांत देशभरात 16,326 नवीन रूग्णांची नोंद झाली.

देशातील कोविड सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1,73,728 असून गेल्या 233 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण रुग्णांच्या 0.51% आहे, जो मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत सतत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 13,64,681 चाचण्या केल्या गेल्या.  भारताने आतापर्यंत एकूण 59.84 कोटी (59,84,31,162) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढत असताना, साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 1.24% वर असून गेल्या 29 दिवसांपासून 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर 1.20% इतका नोंदवला  गेला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर गेल्या 19 दिवसांपासून 2% च्या खाली आणि आता सलग 54 दिवस 3% च्या खाली राहिला आहे.