राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव ; खंडाळा येथील ग्रामस्थांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विमानतळावर भेट

वैजापूर ,२३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे मातोश्री नर्मदा प्रतिष्ठाण व शिवसेना शाखेच्यावतीने माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे. या कीर्तन महोत्सवाचे आयोजकांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची चिकलठाणा विमानतळावर भेट घेऊन कीर्तन महोत्सवाची माहिती दिली.

गेल्या दहा वर्षांपासून खंडाळा येथे बाळासाहेब ठाकरे ग्रामीण नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते.गेल्या वर्षांपासून माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथे आले असता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह किर्तन महोत्सवाचे आयोजक कचरू वेळंजकर , मातोश्री नर्मदा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मुरलीनाना थोरात, आशुतोष  डंख, प्रकाश आंबेकर आदींनी चिकलठाणा विमानतळावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना कीर्तन महोत्सवाची माहिती दिली. माजी सरपंच गोरख शिंदे, उमेश शिंदे,विजय मगर,रामदास त्रिभुवन,बाळासाहेब जानराव आदी यावेळी उपस्थित होते.