जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस

औरंगाबाद, दिनांक 12 :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. या लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून वाढता संसर्ग टाळण्यासाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी मास्‍क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया सोनवणे, डॉ.महेश लढ्ढा उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील उपचार सेवा सुविधांची माहितीही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी यावेळी घेतली.