नांदेड जिल्ह्यात 625 व्यक्ती कोरोना बाधित, तिघांचा मृत्यू

नांदेड दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 625 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 361 तर अँटिजेन तपासणीद्वारे 264 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 29 हजार 145 एवढी झाली आहे.

बुधवार 17 मार्च 2021 रोजी चौफाळा नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर लेबर कॉलनी नांदेड येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर गुरुवार 18 मार्च रोजी शिवाजी चौक हदगाव येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 627 एवढी झाली आहे.

आजच्या 2 हजार 211 अहवालापैकी 1 हजार 549 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 29 हजार 145 एवढी झाली असून यातील 24 हजार 565 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 728 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 14, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 147, कंधार तालुक्यांतर्गत 4, देगलूर कोविड रुग्णालय 1, उमरी तालुक्यांतर्गत 5, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, मुखेड कोविड रुग्णालय 12, माहूर तालुक्यांतर्गत 4, मुदखेड तालुक्यांतर्गत 3, हदगाव कोविड रुग्णालय 14, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 236 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.28 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 59 हजार 04एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 25 हजार 20एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 145एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 565एकुण मृत्यू संख्या-627उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.28 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-325रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 728आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-51.