उद्योजक हेमंत मिरखेलकर यांना पितृशोक,माधवराव मिरखेलकर यांचे निधन

औरंगाबाद :सम्राट कॉलनीतील रहिवाशी माधवराव मिरखेलकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.ते सिंचन विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शहरातील उद्योजक हेमंत मिरखेलकर आणि प्रशांत मिरखेलकर यांचे ते वडील होत. मिरखेलकर कुटुंबाच्या दुःखात आज दिनांक परिवार सहभागी आहे.