नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली कोरोना लस

नांदेड, दि. 12 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबई येथे जे. जे. शासकीय रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी शासनाने लसीकरणाचे विविध टप्पे आखून दिले आहेत. शासनाने आवाहन केल्याप्रमाणे जनतेने निर्भयतेने लसीकरणासाठी पुढे सरसावे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.