लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर नांदेडला…शिल्लक तीनच ..!

लोहा,१६ एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोना सारख्या महामारीच्या काळात जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्राकडून जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर लेटर आणले होते.  त्यातील 20 व्हेंटिलेटर दिले होते रुग्णांची वाढती संख्या असतानाही व्हेंटिलेटर उपयोगात आणण्यास संबंधित यंत्रणा यशस्वी झाली नाही त्यातील १७ व्हेंटिलेटर मेडिकल कॉलेज व जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये   देण्यात आले उर्वरित तीन व्हेंटिलेटर  शिल्लक  आहेत.लोहा कोविड रुग्णालयात ऑक्सीजन आय सी यु ची सोय आहे परंतु कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर नसल्या कारणाने व्हेंटिलेटर  वर्षभरापासून कार्यान्वित झाले नव्हते त्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही.

खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मुळेच लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात वीस व्हेंटिलेटर मिळाले होते.आपल्या भागातील रुग्णांना कोरोनाचा  उपचार  सरकारी दवाखान्यात विनामूल्य व्हावा  हा त्यांचा हेतू परंतु व्हेंटिलेटर  सुरू करण्यासाठी त्यांच्या देखरेखीसाठी तज्ञ डॉक्टर सह विशेष  –कर्मचाऱ्यांची। प्रशिक्षित टीमची  गरज लागते परंतु या भागातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे वर्षभरापासून ही सुविधा धूळखात पडून राहिली आणि आता ती जेथे त्याची नितांत गरज आहे तेथे ते हलविण्यात आले          

वाढते रुग्ण पाहता जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने येथे व्हेटिलेटर मागून घेतले व ते रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगआणले त्यामुळे अनेकांना  दिलासा मिळाला परंतु ‘कर्तव्यदक्ष’ लोकप्रतिनिधीनी वेळीच तज्ञ डॉक्टर व टिमची  सोय केली असती तर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असता परंतु लोकांच्या परेशानी इकडे कोणाचेच लक्ष नाही  असा संताप नागरिकांतून व्यक्त होतो  आहे.

व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करा–संजय पाटील कऱ्हाळे

शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहे आहेत. शिवाय मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आली आहे अशा काळात लोह्याच्या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी केली आहे.लोहा शहर व तालुक्यात  कोरोनाचा रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात काहीं गावात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने झाला आहे .त्यामुळे शहरी भागा पेक्षा खेड्यात कोरोनाच्या संदर्भात नियमांचे पालन होत नाही कारण गृहविलगिकरणाची सोय नसते कारण लहान घर आणि कुटुंबातील संख्या अधिक असते .त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागात कोरोना उपचाराच्या सुविधा वाढविणे गरजेचे आहे असे संजय पाटील कऱ्हाळे यांनी सांगितले.

आरोग्य कर्मचारी संख्या वाढवा- सचिन मुकदम

कोविड सेंटर मध्ये दररोज दोनशे- तीनशे जणांचे  स्वॅब घेतले जात आहेत पण त्यासाठी फक्त  दोन –  तीन  तंत्रज्ञ यासाठी दिवसभर काम करीत आहेत .रात्री उशिरा पर्यन्त त्यांचे अहवाल पाठविणे काम करावे लागत आहे .या कामासाठी इतरत्र पाच -सहा कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे लोह्याच्या  कोविड सेंटरला स्वॅब साठी अधिक आरोग्य कर्मचारी द्यावेत अशी मागणी  युवा कार्यकर्ते सचिन पाटील मुकदम यांनी  जिल्हा शल्यचिकित्सक , तहसीलदार  यांच्याकडे केली आहे.