नांदेड जिल्ह्यात 126 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

240 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 25 :- मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 240 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 126 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 56 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 70 बाधित आले.

आजच्या एकुण 700 अहवालापैकी 547 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 5 हजार 276 एवढी झाली असून यातील 3 हजार 538 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 510 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 181 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नवरंगपुरा येथील 55 वर्षाचा एक पुरुष, अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील 60 वर्षाची एक महिला, बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील 60 वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड तर किनवट येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज बरे झालेल्या 240 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 56 बाधित आढळले.तर अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 70 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 510 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 172,
घेतलेले स्वॅब- 35 हजार 656,
निगेटिव्ह स्वॅब- 28 हजार 525,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 126,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 276,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,
एकूण मृत्यू संख्या- 192,
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 538,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 510,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 88,
आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 181.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *