आरोग्यासाठी प्रशासकीय नियमांचे पालन करूया – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

अयोध्यानगरीत जय महाराष्ट्र फटाका असोशिएशनचे स्तंभपुजन

औरंगाबाद, १७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-सध्या कोरोनाचे संकट अद्याप संपले नाही. त्यामुळे काही नियम व अटी पाळणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी प्रशासनाचे नियमांचे पालन करूया, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

Displaying IMG-20211017-WA0043.jpg

अयोध्यानगरीत जय महाराष्ट्र फटाका असोशिएशनचे स्तंभपुजनप्रसंगी ते बोलत होते.पोलीस प्रशासन व अग्निशमन आणि प्रदूषण व पर्यावरण विभागाने दिलेल्या नियमाप्रमाणे फटाका व्यापारी यांनी मार्केट उभे केले आहे. त्यामुळे सर्वांनी एका छताखाली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे सर्वांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.       

यावेळी आमदार संजय शिरसाठ, माजी  महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, जय महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख संजय बारवाल, उप विभागप्रमुख गुड्डू बासनीवाल, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी पराग कुंडलवाल, भरत मंडोरे, राजू पारगावकर, संजय माचेवाल,सागर वाघचौरे,  उमेश बडोडे, विलास खंडेलवाल, अनिल चौडिये, प्रशांत वडगावकर, गोपी घोडले, राम फुलंब्रीकर,किसन भाटिया आदिंसह नागरिक व व्यापारी उपस्थिती होते.