केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनतेशी संवाद साधण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड

Image

औरंगाबाद,२० ऑगस्ट /प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या का, या योजनांचा लाभ मिळताना जनतेला कोणत्या अडचणी आल्या हे जाणून घेणे हा जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश आहे. याकडे राजकारण अथवा भाजपा म्हणून न पाहता समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी यात्रा आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी शुक्रवारी जालना येथे पत्रकार परिषदेत सांगितले. रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही यावेळी उपस्थित होते.

Image

या यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांची माहितीही जनतेस देण्यात आली. तसेच लाभार्थी व अन्य समाज घटकांचे प्रश्न जाणून घेण्यात आले, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

गंगाखेड  येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या एका लाभार्थी शेतकऱ्याने पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यासाठी लाल फेटा आपल्याकडे दिला, तर लोहा येथे मुस्लिम समाजाच्या महिलेने तलाक विरोधी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे भाषणात जाहीर आभार मानले. मोदी सरकारच्या अनेक निर्णयाचे कौतुक होत आहे. तर मुद्रा योजना, पीक कर्ज, पीक विमा मिळत नाही अशा तक्रारीही काहीनी केल्या. या संदर्भात येत्या 27 तारखेला मुंबईत आपण सर्व बँक अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेणार आहोत, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

Image

पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, यात्रा समन्वयक मनोज पांगारकर, सह समन्वयक प्रवीण घुगे, माजी आमदार विलास खरात, ज्येष्ठ नेते भास्कर दानवे, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, शहराध्यक्ष राजेश राऊत आदी उपस्थित होते.

शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटनांच्या  पदाधिकाऱ्यांनी दानवे आणि डॉ.कराड यांना विविध विषयांबाबत निवेदने सादर केली.

आशीर्वाद यात्रेचा कन्नड शहरात समारोप
भारतीय जनता पार्टीने सबंध  देशभर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले असून दि.16 ऑगस्ट रोजी परळी येथील गोपीनाथगडा हुन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे ,खासदार डॉ.प्रितम ताई मुंडे यांचे सह स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात सुरूवात केली. जन आशीर्वाद यात्रा बीड,नांदेड,हिंगोली, परभणी, जालना ,औरंगाबाद असे सहा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत यात्रेचा औरंगाबाद जिल्ह्यातील मार्केट यार्ड, मोंढा , कन्नड येथे दिनांक 21 रोजी स्वागत व समारोप होणार आहे.कन्नड येथे  जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागत व समारोप साठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे,महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर येणार आहेत.       

जन आशीर्वाद यात्रेत केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. त्या योजनांचा लाभ जनतेस होत आहे त्याच प्रमाणे त्या योजना जनते पर्यंत पोहचावण्या साठी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते कार्य करीत आहेत. जन आशीर्वाद यात्रेत मोदी सरकार करीत असलेल्या कामा मुळे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ह्या यात्रेचे आयोजन भारतीय जनता पार्टीने केले आहे.जन आशीर्वाद यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दि 21 रोजी औरंगाबाद महानगर व जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा मार्गक्रमण करीत कन्नड येथे जाणार आहे.जन आशीर्वाद यात्रेत सर्व नागरिक,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कन्नड येथील स्वागत व समारोपा साठी उपस्थित राहावे असे आवाहन आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे,आमदार हरिभाऊ बागडे,आमदार अतुल जी सावे,आ.प्रशांत बंब, प्रवीण घुगे,ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, लक्ष्मण पाटील औटे,जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते,दिनेश परदेशी,राजू शिंदे,समीर राजूरकर,डॉ.संजय गव्हाणे,जिल्हा कार्यालय मंत्री व्यंकटेश कमळू,ज्ञानेश्वर नलावडे,किशोर आबा पवार यांनी केले आहे.