गॅस शव दाहिनी काळाची गरज, लवकरच इतर स्मशानभुमीतही कार्यन्वित करणार – प्रशासकआस्तिक कुमार पाण्डेय

कैलास नगर स्मशानभुमी येथील  गॅस शव दहिनीचे प्रशासक पाण्डेय यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद,२० ऑगस्ट /प्रतिनिधी :- प्रदूषण व पर्यावरणाच्या दृष्टीने महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून एलपीजी गॅस शव दहिनी काळाची गरज असून इतर स्मशानभुमीही टप्प्याटप्प्याने गॅस शव दाहिनी सुरू करण्यात येतील, महानगरपालिका आणि नागरिक एकत्र आल्यास शहराच्या विकासाबाबत चमत्कार घडेल, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

May be an image of 2 people, people standing, people sitting and indoor

महानगरपालिकेच्या कैलास नगर स्मशानभुमी येथील एलपीजी गॅस शवदहिनी व इमारतीचे नूतनीकरण औरंगाबाद फर्स्ट आणि लायन्स क्लब औरंगाबाद मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते आज शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.

May be an image of 8 people, people standing and indoor

याप्रसंगी बोलताना महानगरपालिका  प्रशासक  पाण्डेय म्हणाले की, नागरिक एकत्र येऊन शहराच्याबाबत जबाबदारी घेतात तेव्हा कोणतीही शहर पुढे जाईल, लायन्स क्लब सारख्या संघटना सामाजिक कार्यात एकत्र येतात ही अतिशय आनंदाची बाब आहे. महानगरपालिका सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अशा संस्था आणि संघटनांच्या सोबत आहे. कोविड सारख्या महामारी च्या काळात नागरिकांनी साथ दिली त्यामुळे आपण त्यावर मात करू शकलो.

May be an image of 3 people, people standing and indoor

महानगरपालिकेने पर्यावरण व प्रदूषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले असून शेव दहनासाठी यापुढे लाकडाचा वापर टाळण्याचा विचार महानगरपालिका करीत आहे. ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन महानगरपालिका पर्यावरणाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे. त्याचा वापर करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत  आहे. दरम्यानच्या काळात विद्युत शेव दाहिनी प्रयत्न केला होता मात्र नागरिकांची मानसिकता नसल्याने विद्युत श़व दाहिनी वापर झाला नाही.मात्र आता गॅस शव दाहिनी चांगली आहे.त्यामुळे अग्नीची पवित्रता कायम राहणार आहे. लोक याचा वापर करतील आणि ही काळाची गरज असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

May be an image of 4 people, people sitting and people standing

सिडको एन ६ येथील स्मशानभूमीत महानगरपालिकेच्या वतीने व रामनगर येथे क्रेडाई सोबत गॅस शव दाहिनीचे काम सुरू आहे. कैलास नगर स्मशानभुमी येथील गॅस शव दाहिनाचे कमी कालावधीत काम पूर्ण केल्याबद्दल प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी लायन्स क्लब वऔरंगाबाद फर्स्ट यांच्या सहकार्याबद्ल आभार मानले . कैलासनगर रस्त्याची कामे लवकरच पूर्ण होईल असे सांगून प्रशासक म्हणाले की, महानगरपालिका आणि नागरिक एकत्र आले तर विकासाबाबत चमत्कार घडेल त्यामुळे शहराच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काम करू या अशी अपेक्षा  प्रशासकांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उद्योगपती राम भोगले, औरंगाबाद फर्स्ट चे प्रितेश चॅटर्जी, मानसिंग पवार, महावीर पाटणी, ऋषी बागला यांनी आपले मनोगत व्यक्त करून शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला सहकार्य करण्यास आम्ही तत्पर असल्याचे  सांगितले.

May be an image of 8 people and people standing

या  कार्यक्रमाला महानगरपालिकेचे शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, मनपा विद्युत विभागाचे ए .बी. देशमुख, झोन क्रमांक 9 चे जरारे, औरंगाबाद फर्स्ट चे रंजीत कक्कड, रवींद्र कोंडेकर, अनिल माळी ,प्रशांत देशपांडे ,शेख हबीब ,शिवप्रसाद जाजू ,हेमंत लांडगे, निखिल भालेराव ,ललित जाधव ,अविनाश देशमुख स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान,आदी उपस्थित होते. औरंगाबाद फर्स्ट चे रंजीत कक्कड यांनी आभार मानले.