सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी , नुकसानीचे सरसकट पंचनामे करणार — पालकमंत्री देसाई यांचा शेतकऱ्यांना दिलासा

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या वैजापूर तालुक्यातील लासुरगांव, सोनवाडी गावाला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता.७) भेट देऊन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त मदत केली जाईल.असे आश्वासन त्यांनी दिले.

पालकमंत्री श्री.देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना धीर दिला.जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून,पशुधनाचेही नुकसान झाले आहे.बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल,सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे.असे सांगून शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला.तालुक्यातील लासुरगांव व सोनवाडीला भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे बाधित व स्थलांतरित कुटुंबियांशी सवांद साधला. शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे,आ.रमेश पाटील बोरणारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतपिकांसह पशुधनाचेही नुकसान झालेले आहे. झालेले नुकसान आर्थिक मदत देऊन भरुन येईल, असे नाही. मात्र, शेतकऱ्यांना धीर देऊन शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.

गंगापूर तालुक्यातील आसेगावातील सोमीनाथ जीते,नामदेव जीते यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीची पाहणी श्री. देसाई यांनी केली. आसेगावात कापूस, मका, तुर, बाजरी, मुग, भूईमूग, सोयाबीन फळबाग आदीसंह भाजीपाल्याचे क्षेत्रांचे नुकसान झाले, असे यावेळी श्री.देसाई यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सोनवाडी गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. पालकमंत्री देसाई यांनी लासूर गावपुरामुळे बाधित व स्थलांतरीत झालेल्या कुटुंबियांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधनू त्यांचे मनोधैर्य उंचावले.

आर.एम.वाणी यांच्या कुटुंबियांशी सांत्वनपर भेट 

 वैजापूर तालुक्यातील बाधित क्षेत्राचा दौरा आटोपल्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्याचे माजी शिवसेना आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,आ. अंबादास दानवे,आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, आसाराम रोठे, बाजार समितीचे उपसभापती विष्णू जेजुरकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,मनाजी मिसाळ, अविनाश गलांडे आदी यावेळी उपस्थित होते.