कोविड लसीकरण अधिक करण्यावर भर द्या- अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

औरंगाबाद,७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोविड आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी यंत्रणांनी अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्यावर भर द्यावा. 08 ऑक्टोबर ते 14 ऑॅक्टोबर दरम्यान मिशन कवच कुंडल मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत उत्सफूर्तपणे नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी रुग्णालयातील मोफत कोविड लसीकरण करावयाचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.मंडलेचा, डॉ.लड्डा, डॉ.प्रेरणा संकलेचा, आदींसह विविध खासगी डॉक्टर, प्रतिनिधीचे  उपस्थिती होती.

डॉ.गव्हाणे यांनी लसीकरण वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. जनजागृतीवर भर द्यावा. नवीन लसीकरण केंद्रावरील सर्वांचे लसीकरण करून घेण्यात यावे, अशाही सूचना केल्या.

डॉ.लड्डा, डॉ.मंडलेचा यांनीही विविध खासगी रुग्णालयातील लसीकरण, सद्यस्थिती, शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या लस, सोयी सुविधांबाबत माहिती दिली.