मकबरा, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिरात लाईट अँड साउंड शो – आयटीडीसीचे उपाध्यक्ष रवी पंडित यांची माहिती

खुलताबाद ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून  जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या  विकास कामासाठी  केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला सविस्तर अहवाल सादर  केला जाणार असून औरंगाबाद येथील बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिरात लाईट अँड साउंड शो साकारणार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे भाग्य उजळणार असल्याची माहिती  आयटीडीसीचे उपाध्यक्ष रवी पंडित यांनी “आज दिनांक” शी  बोलताांना  दिली. 
आयटीडीसीचे उपाध्यक्ष रवी पंडित यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देऊन पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आयटीडीसीचे उपाध्यक्ष रवी पंडित यांनी अजिंठा लेणी,  दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, वेरूळ येथील  घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ,अहिल्यादेवी तीर्थकुंड , शहाजीराजे भोसले स्मारक आणि औरंगाबाद मधील बिबी का मकबारा या ठिकाणी भेट दिली. यावेळी गाईड भरत जोशी यांनी त्यांना वेरूळ लेणीच्या माहिती दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साऊंड आणि लाईट शो एलिमिनेशन लेदर टेक्नॉलॉजी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहे. पर्यटन विकासाच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने त्यांचीही भेट  अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनाची राजधानी असल्याने पर्यटन विकास करण्यासंदर्भात योजना आखली जात असून पर्यटनाच्या विकासातून सामाजिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. आयटीडीसीचे उपाध्यक्ष रवी पंडित यांनी दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, वेरूळ  लेणी आणि बिबी का मकबारा या ठिकाणी भेटी देऊन पर्यटनाच्या विकासासाठी काय करता येईल याविषयी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवरांशी त्यांनी चर्चा केली. दौलताबाद येथील प्राचीन देवगिरी किल्ला येथे साउंड अँड लेझर शो, रोप वे, वेरूळ येथील  घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात  साऊंड आणि लेदर शो, आधुनिक तंत्रज्ञानाने  भगवान शंकरांची महती आणि आरती आधुनिक पद्धतीने लेझर शोद्वारे भाविकांना दाखविण्याचा प्रस्ताव आहे. औरंगाबाद शहरातील  बीबी का मकबरा देखील लाखो पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. औरंगाबाद शहरामध्ये मध्यवर्ती भागात असून त्या ठिकाणी नाईट टुरिझम विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून याठिकाणीही लेदर शो  करण्याचे नियोजन आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या पुढाकाराने पर्यटन विकासाच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणचे प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू आहे. अहमदाबाद येथील एका प्रख्यात संस्थेने या सर्व प्रकल्पांचे डी.पी.आर. तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्रालय स्तरावर या प्रस्तावावर महत्वपूर्ण निर्णय होत असून  आयटीडीसीचे उपाध्यक्ष रवी पंडित यांनी औरंगाबाद  जिल्ह्यातील पर्यटनाच्या स्थळांना भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ मिलनकुमार चावले, जसवंतसिंह, संवर्धन सहाय्यक राजेश वाकलेकर  ,घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशांक टोपरे, कार्याध्यक्ष योगेश विटखेडे,  घृष्णेश्वर मंदिर दुकानदार असोशिएशनचे अध्यक्ष गणेश हजारी, एलोरा शॉप किपरचे सचिव गोपाल गरिकीपाटी उपस्थित होते