छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण

औरंगाबाद : देशातील सर्वाधिक उंचीचा औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित होते. 

औरंगाबाद​ ​शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तिायज जलील, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर कसे तरी घाई-घाईने यावेळी स्मारकाचे काम पूर्ण करत महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. पण पुतळ्याचे लोकार्पण कधी आणि कुणाच्या हस्ते करायचे, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होत नव्हती, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठी नाराजी होती. तर याबाबत शिवजयंती महोत्सव समितीकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने तारीख जाहीर केल्याने या वादावर पडदा पडला आहे.


औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान व्हावा यासाठी शिवप्रेमींना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मात्र आता त्यांच्या संघर्षाला यश आले असून महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. २५ फूट उंच आणि तब्बल ०८ टन वजन असलेला पुतळ्याचे अनावरण झाले आहे.

यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनावरणानंतर भव्य रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात आली.  देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. 
क्रांती चौक येथील छत्रपती शिवजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाविषयी माहिती        • पुतळयाची उंची : 21 फुट•         

पुतळयाचे वजन : 7 मेट्रीक टन•         

पुतळयासाठी वापरण्यात आलेला धातु : ब्रांझ धातु (Gun Metal)

•         पुतळयाच्या चौथाऱ्याची उंची : 31 फुट

•         चौथाऱ्यास पुतळ्याची एकुण उंची : 52 फुट

•         चौथाऱ्याचे बांधकाम आर.सी.सी.मध्ये असुन चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग •         चौथाऱ्याभोवतीच्या 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत.

•         चौथाऱ्याभोवतीच्या कांरजे (Cascade Fountain) तयार करण्यात आलेले आहे. तसेच हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

•         अश्वारुढ पुतळा तयार करणे रक्कम रु.: 98.00 लक्ष

•         चौथऱ्यांचे बांधकाम करणे रक्कम रु : 255.00 लक्ष

•         एकूण अंदाजपत्रकिय रक्कम रु: 353.00 लक्ष 

•         पुतळा शिल्पकार : मे.चित्रकल्प, धायरी,पुणे (प्रो.दिपक थोपटे)•         वास्तुविशारद : श्री.धीरज देशमुख, औरंगाबाद

•          आर.सी.सी.कन्सटल्टंट : श्री.रविंद्र बनसोडे, स्ट्रक्चरल, इंजिनिअर, औरंगाबाद

•         कामामध्ये समाविष्ट संक्षिप्त बाबी :

पुतळा बसविण्यासाठी सुमारे 31 फुट उंच चौथाऱ्याचे बांधकाम करणे.

चौथाऱ्यास विविध स्कल्पचर / म्युरल बसविणे,

कांरजे बसविणे,

चौथाऱ्याचे सुशोभिकरण करणे आणि त्यावर 21 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन अश्वारुढ पुतळा उभारणेचा समावेश आहे.