वैजापूर शहर व ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून पाहणी

वैजापूर ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वैजापूर शहर व परिसरातील गावांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी भेटी देऊन आपद्ग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

श्री.खैरे यांनी वैजापूर शहरातील दत्तवाडी परिसराला भेट देऊन नारंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनतर त्यांनी तालुक्यातील भिवंगाव व खंडाळा गावाला भेट दिली.अतिवृष्टी व ढेकू व बोर नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतातील उभी पिके वाहून गेली असून,घरांमध्येही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. श्री.खैरे यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी श्री.खैरे यांच्यासोबत आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,तहसीदार राहुल गायकवाड,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,तालुकाप्रमुख सचिन वाणी,शहरप्रमुख राजेंद्र साळुंके,नगरसेवक प्रकाश चव्हाण,स्वप्नील जेजुरकर,इम्रान कुरेशी, भाऊसाहेब गलांडे,महेश बुणगे,सलीम वैजापुरी, युवासेनेचे अमीरअली,श्रीराम गायकवाड,बळीराम राजपूत,पारस घाटे,बिलाल सौदागर,श्रीकांत साळुंके,कपिल खैरे,गोरख शिंदे, रहीम बागवान, रामभाऊ त्रिभुवन,ताराचंद वेळांजकर आदी उपस्थित होते.