औरंगाबाद पासपोर्ट कार्यालय लवकरच पुन्हा सुरू होणार

खासदार इम्तियाज जलील यांची टपाल व पासपोर्ट विभाग प्रमुखांशी चर्चा

औरंगाबाद : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर २८ मार्च २०२० पासून बंद असलेला औरंगाबाद पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मुंबईतील पासपोर्ट विभागाचे प्रादेशिक अधिकारी मनोजकुमार राय आणि औरंगाबाद येथील पोस्ट मास्टर जनरल व्ही.एस. जयशंकर यांच्याशी सदरील प्रकरणात सविस्तर चर्चा करुन औरंगाबाद येथे लवकरच पासपोर्ट कार्यालय पुन्हा उघडण्याचे सुचना दिल्या. औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय बंद केल्यामुळे त्रास होत असल्याचे अनेक नागरीकांनी थेट खासदार इम्तियाज जलील यांच्या कडे तक्रार केली होती. सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार इम्तियाज जलील यांनी तात्काळ संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन पासपोर्ट कार्यालय पुन्हा उघडण्याचे सुचना दिल्या.

पासपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की औरंगाबाद पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी टपाल खात्याकडून मंजुरीची प्रतीक्षा करीत आहेत. टपाल विभाग आणि पासपोर्ट कार्यालयातील दोन्ही अधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना त्वरीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.