वैजापूरमध्ये मोफत लसीकरणास प्रारंभ 

वैजापूर ,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्यावतीने वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघात 37 हजार नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे.

Displaying IMG-20210921-WA0103.jpg

आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात 33 हजार लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले असून,उर्वरित 4 हजार लसीचे  वैजापूर शहरासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Displaying IMG-20210921-WA0098.jpg

वैजापूर शहरातील लसीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्ष साबेरखान यांच्याहस्ते करण्यात आले.

Displaying IMG-20210921-WA0101.jpg

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शहरप्रमुख राजेंद्र साळुंके,गटविकास अधिकारी श्री.मोकाटे यांच्यासह आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.