वैजापूरच्या प्रकल्पात पाण्याची आवक सुरु

वैजापूर ,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे वैजापूर तालुक्यातील विविध पाणी प्रकल्प जवळपास भरले आहे. नाशिक जिल्ह्यातील  विविध धरणातूनही पाणी सोडण्यात आले असून, पाण्याची आवक सुरूच आहे.बोर-दहेगाव मध्यम प्रकल्प ,कोल्ही मध्यम प्रकल्प ,टेंभापुरी मध्यम प्रकल्प आणि मन्याड साठवण तलाव १०० टक्के भरले आहेत. 

वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्प व त्यातील आज सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढील प्रमाणे-

-नारंगी मध्यम प्रकल्प – 56.74 टक्के

बोर-दहेगाव मध्यम प्रकल्प – 100 टक्के

कोल्ही मध्यम प्रकल्प – 100 टक्के 

टेंभापुरी मध्यम प्रकल्प – 100 टक्के

बिलवणी लघु तलाव – 40.31 टक्के

खंडाळा लघु तलाव – 75.68 टक्के

मन्याड साठवण तलाव – 100 टक्के

वांजरगाव कोल्हापूर टाईप बंधारा – 100 टक्के