वैजापुरात गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी ; रोटेगांव येथे भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना

वैजापूर ,१६ मे /प्रतिनिधी :- जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण व शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध जयंती व बौद्ध पौर्णिमेनिमित्त वैजापुर शहरात व रोटेगाव येथे जल्लोषमध्ये मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली. रोटेगांव येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली.

वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती रूपाची प्रतिस्थापना  बुद्ध पौर्णिमा दिनी सोमवारी पूज्य भदंत करुणानंद  बोधी संस्थापक नालंदा धम्मभूमी कांची माची ता.संगमनेर  यांनी केली व रोटेगाव पंचक्रोशीतिल सर्व बुद्ध भक्तांना बुद्ध पौर्णिमा दिनी अनमोल भेट दिली.

जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंह राजपूत यांनी यात सिंहाचा वाटा उचलला. या बुद्ध रूपाची प्रतिस्थापना व मिरवणुकीत आ. रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी,  जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, दीपक राजपूत, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, माजी सरपंच धीरज राजपूत, संदीप राजपूत, सरपंच संभाजी शिंदे, उपसरपंच भास्कर पाटील शिंदे, ग्रामसेविका यू.आर.मोकळे ,भीमा थोरात, लक्ष्मण मोकळे, छबु पठारे, सुनील थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती मिरवणूक एमआयटी कॉलेज ते गंध कुटी बुद्ध विहारपर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. या समयी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी भेट दिली त्यांच्या समवेत रामहरी जाधव, राजू केदार, होते.रोटेगाव येथील महिला व पुरुष तसेच बालके मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी ते साठी माजी सरपंच भीमा थोरात,कचरू थोरात,लक्ष्मण मोकळे, नामदेव थोरात, कैलास अभंग,धीरज राजपूत,संदिप राजपूत यांनी सहकार्य केले. याप्रसंगी विलास म्हस्के, साहेबराव पडवळ, विशाल त्रिभुवन यांच्यासह रोटेगावचे सर्व ग्रामस्थ,बुद्ध विहार मित्रमंडळ, तरुण मित्र मंडळ शकुंतला मोकळे ,मनीष दिवेकर आदी उपस्थित होते.