वाकला येथे शेतात घुसून बेकायदेशीररीत्या अतिक्रमण काढले ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर,​९​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-शेतात घुसून रस्त्यावरील अतिक्रमण बेकायदेशीररित्या काढणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील वाकला येथे गुरुवारी घडली.

नारायण रावजी सोनवणे यांची वाकला शिवारात जमीन असून या शेतातून स्वतःच्या मालकीचा रस्ता आहे.या रस्त्यावर गावातील काही लोक जेसीबी व ट्रक्टर घेऊन आले.त्यांनी विना परवाना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी नारायण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरखनाथ भागीनाथ थोरात,दिपक गोरखनाथ थोरात व नवनाथ वाल्मीक मगर रा.वाकला या तीन जणांविरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार हे करीत आहेत.