नायगव्हाण व आंचलगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.बोरणारेकडून सत्कार

वैजापूर,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नायगव्हाण व आंचलगाव गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची” निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच सर्व संचालक व ग्रामस्थांनी सोमवारी आमदार जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी मतदारसंघाच्यावतीने आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी “नायगव्हाण” या सेवा सहकारी संस्थेवर चेअरमनपदी आण्णासाहेब पाटील  सोनवणे व व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब पाटील खोसे तसेच आंचलगाव  सेवा सहकारी संस्थेवर चेअरमनपदी नितीन पाटील निकम व व्हाईस चेअरमनपदी ईश्वर पाटील कोकाटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्यासह दोन्ही गावातील सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. 
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, गोरख आहेर, महेश बुनगे, उपविभागप्रमुख अंबादास  खोसे, संचालक सिताराम खोसे, शिवाजी  सोनवणे, नवनाथ सोनवणे, गोरख सोनवणे, आण्णासाहेब पठारे, राजेंद्र खोसे, आण्णासाहेब कबाडे, कांताबाई कबाडे, राधाबाई खोसे,  पुष्पाबाई जाधव, ताराबाई गायके,  यमुनाबाई नन्नावरे, राजू कोकाटे, दिगंबर गायके, सावळीराम पवार, सरपंच मच्छिंद्र गायके, उपसरपंच किशोर काकडे, सोपान गायके, दगडू  जाधव, ईश्वर गायके, संजय खोसे, राहुल सोनवणे, सहदेव जाधव, कृष्णा खोसे, शिवलाल खोसे, अर्जुन खोसे, राधाकिसन सोनवणे, येडुबा सोनवणे, वाल्मिक जाधव, कैलास खोसे, दादासाहेब कबाडे, सोपानराव सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे,अंकुश खोसे, भावलाल कबाडे, ज्ञानेश्वर सोनवणे, बाळू सुरासे, भाऊसाहेब जाधव, कैलास कोळशे, नवनाथ जाधव, रामदास हराळ, सिताराम नन्नावरे, प्रकाश नन्नावरे यांच्यासह प्रमूख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.