क्रीडा भारतीतर्फे खेळाडूंचा व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव !

औरंगाबाद,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद क्रीडा भारतीच्या वतीने खेळाडूंचे व क्रीडा क्षेत्रातील विविध आयमाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गौरव राष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिसपटू निलेश मित्तल आणि शहर कार्यवाह संतोष पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे हे  होते.
सिडको एन-१ येथील AEVPM वुमन्स कॉलेज येथे पार पडलेल्या या गौरव  समारंभाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक मध्ये युवतीप्रमुख स्नेहा पारीखने क्रीडा भारतीच्या वतीने वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम बद्दल माहिती देत क्रीडा भारतीचे उद्दिष्ट स्पष्ट केले, यामध्ये प्रामुख्याने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन, पावन खिंड दौड, राष्ट्रीय क्रीडा दिन, वीर जिजामाता पुरस्कार, सूर्यनमस्कार स्पर्धा बद्दल माहिती दिली.
कार्यवाह संतोष पाठक म्हणाले की, ‘क्रीडा से निर्माण चरित्र का और चरित्र निर्माण राष्ट्र का’ हे ब्रीदवाक्य घेऊन क्रीडा भारती देशभर क्रीडा संस्कृती रुजवण्याचे काम करत असते. तसेच दरवर्षी क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा, शिक्षकांचा व संघटक  यांच्या सत्काराचे आयोजन करते पण या वर्षी क्रीडा भारतीने क्रीडा क्षेत्रातील विविध २८ आयामात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करून शहरातील संपूर्ण क्रीडा जगातला एकत्र आण्याचे काम केले त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात नागरिकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी मदत होईल.
गौराव समारंभाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिसपटू निलेश मित्तल म्हणाले की, स्वयंशिस्त व सांघिक वृत्तीने खेळ खेळला तर खेळात यशस्वी होता येतं, यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्याला पुढील आयुष्यात व व्यवसायात देखील याचा उपयोग होईल. खेळत असताना स्वतःसाठी खेळ न खेळता देशासाठी खेळावे. क्रीडा भारती ने हा गौरव समारंभ आयोजित करून क्रीडा क्षेत्रातील विविध आयाम एकत्र आणल्या बद्दल त्यांनी क्रीडा भारती चे विशेष अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप किस्ती यांनी केले तर आभार प्रा.विनायक राऊत यांनी मानले.
गौरव करण्यात आलेले क्रीडा क्षेत्रातील मान्यवर-,
१) आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रेणी-शर्वरी कल्याणकर (दुबई येथे झालेल्या साउथ एशियन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडलिस्ट)
२) शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रेणी- सागर बडवे (NIS कोच आणि देफ ऑलम्पिक मेडलिस्ट)
३) महिला क्रीडा संघटक श्रेणी-डॉ. केजल भारसाखळे (उपाध्यक्ष औरंगाबाद बॉक्सिंग संघटना)
४) महिला क्रीडा प्रशिक्षक श्रेणी-लता कलवार (स्वयमसिद्धा व ताइक्वांडो कोच)
५) पुरुष क्रीडा संघटक श्रेणी- गोविंद शर्मा (सचिव महाराष्ट्र खो-खो संघटना)
६) पुरुष क्रीडा प्रशिक्षक श्रेणी-राहुल टाक (राष्ट्रीय बॉक्सिंग कोच)
७) महिला क्रीडा शिक्षक श्रेणी- दीप्ती शेवतेकर  (पोद्दार हायस्कूल)
८) पुरुष क्रीडा शिक्षक श्रेणी- डी आर खैरनार (अध्यक्ष औरंगाबाद क्रीडा शिक्षक संघटना)
९) विद्यापीठ क्रीडा संचालक श्रेणी- शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. दिनेश वंजारे (क्रीडा विभाग प्रमुख एमजीएम विद्यापीठ)
१०) क्रीडा साहित्य विक्रेते श्रेणी-योगेश शिंदे (सुकन्या स्पोर्ट्स)
११) महिला व्यायाम शाळा श्रेणी-ज्योती दांडगे (माही फिटनेस अंड वेलनेस सेंटर)
१२) पुरुष व्यायाम शाळा श्रेणी-दीपक रुईकर (द रॉक हेल्थ क्लब)
१३) कुस्ती आखाडा श्रेणी-हरिदास मस्के(हरीसिद्धी व्यायाम शाळा हरसुल)
१४) क्रीडा स्पर्धा पंच श्रेणी-बाळासाहेब वाघमारे (अध्यक्ष औरंगाबाद क्रिकेट अंपायर बोर्ड)
१५) स्पोर्ट्स मेडिसीन व फिजियोथेरेपी श्रेणी- डॉ. श्रीरंग कुलकर्णी
१६) क्रीडा पत्रकार श्रेणी- जयंत कुलकर्णी (दैनिक लोकमत क्रीडा उपसंपादक) आणि विजय साठे(दैनिक दिव्यमराठी क्रीडा उपसंपादक)
१७) सैनिकी पूर्व प्रशिक्षण श्रेणी- प्रा.राजेश पाटील (डिफेन्स करिअर अकॅडमी हडको)
१८) योग शिक्षक श्रेणी- डॉ. प्रज्ञा तल्हार (योग प्रमुख विद्याभारती देवगिरी प्रांत)
१९) क्रीडा अधिकारी श्रेणी- संजय बालय्या (मनपा क्रीडा अधिकारी)
२०) स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया कोच श्रेणी- सनी घेलावत (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कॉच)
२१) निवृत्त क्रीडा अधिकारी श्रेणी- जे पी आधाने (माजी क्रीडा उपसंचालक) आणि अशोक गिरी (माजी जिल्हा क्रीडा अधिकारी)
२२) क्रीडा प्रबोधनी कोच श्रेणी-इमरान शेख (हॉकी कोच)
२३) युवा खेळाडू श्रेणी-गणेश गौतम (राष्ट्रीय हॉकी खेळाडू)
२४) युवती खेळाडू श्रेणी- आकांशा तम्मेवर (यंगगेस्ट फीमेल बाईक रायडर)
२५) खेळाडू कोरोना योद्धा श्रेणी- स्नेहा पारिक(क्रीडा भारती युवती प्रमुख)
२६) क्रीडा मार्गदर्शक श्रेणी- जब्बार पठाण (राष्ट्रीय हॉलीबॉल कोच)