विकास कामाला प्राधान्य देणारा आमदार संजय शिरसाट : उपमहापौर राजेंद्र जंजाळ

Displaying IMG_7534.JPG

औरंगाबाद,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातील सातारा-देवळाई या परिसरात विकास कामे जोमाने सुरू आहेत, यामध्ये प्रामुख्याने बीड बायपास रोड याठिकाणी 383 कोटींचा मोठा पूल, पाण्याची पाईप लाईन, सातारा-देवळाईतील असलेले अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन ही सर्व कामे जोमाने सुरू आहेत यामध्ये काही कामे पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले ही करण्यात आले आणि काही कामे प्रगतीपथावर असताना  पुनश्च सातारा गाव अंर्तगत आदर्श लॉन्सच्या पाठीमागे सिमेंट रस्ता, सातारा गाव अंर्तगत द्वारकानगरी येथील सिमेंट रस्ता, देवळाई-सातारा अंतर्गत हनुमान मंदिर पासून ते क्रीडा संकुलकडे जाणाऱ्या सिमेंट रस्ता तसेच सातारा गाव अंर्तगत वेणूसुत होसिंग सोसायटी येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.

Displaying IMG_7534.JPG

माझ्या मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न सोडविणे मी माझे पहिले कर्तव्य समजतो, आज या नागरिक-महिला-युवक यांच्यामुळे पाठींबामूळेच मी या भागात प्रतिनिधित्व करू शकलो आणि विकास कामे ही, सातारा-देवळाई या भागातील नागरिकांना या आधी खूप त्रास सहन करावा लागला होता, या भागात कुठे रस्ते नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हत्या, पण आता या भागात रस्ते, ड्रेनेज लाईन झाले आणि होत आहे त्याच बरोबर पिण्याचं पाणी देखील उपलब्ध होत आहे,

Displaying IMG_7806.JPG

या भागासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानावे तितके कमी आहे, आज जे कामे या भागात करत आहे ते कामे नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडून पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून ही सर्व विकास कामे करत आहे. आज या भागात विकास कामे मोठ्या प्रगतीपथावर आहे आणि आज ही काही कामाचे भूमिपूजन झाले, आणि या कामाला उद्यापासून सुरुवात होऊन लवकरच नागरिकाना रहदारीसाठी खुला करण्यात येईल असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी केले.

Displaying IMG_7546.JPG

या भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक सिद्धांत शिरसाट, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रणजित ढेपे, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे, संतोष जाटवे, सतीश पारखे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, ईश्वर पारखे, संजीवन सरोदे, संतोष बारसे, राजे भोसले, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जावेद पटेल, महिला आघाडीच्या उपविभागप्रमुखशीतल जाटवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying IMG_7625.JPG

या भूमीपूजन प्रसंगी उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले की, आमदार पाहिले तर संजय शिरसाट यांच्या सारखा या पश्चिम मतदार संघाला विकासपुरुष लाभला आहे, आमदार शिरसाट यांनी कुठला ही जातीभेद न करता मुस्लिम भागातील नागरिकांना देखील रस्ते, ड्रेनेज लाईन ही कामे करून दिली आहे. कोणी आपल्या मतदार नाही केले म्हणून आपण तो भाग विकासापासून वंचित रहाता कामा नये अशी त्यांची धारणा आहे,

Displaying IMG_7735.JPG

या मतदार संघातील लोकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे, त्यामुळे या मतदार संघाचा आमदार म्हणून ही त्यांची जबाबदारी समजत आज आणि याआधी ही आमदार संजय शिरसाट यांनी विकास कामे करण्याचा धडाका सुरू आहे. बीड बायपास रोड नेहमी अपघात मोठ्या होत असत, या रस्तासाठी आमदार शिरसाट यांनी शासन दरबारी प्रश्न उपस्थित करत या रस्त्यासाठी 383 कोटी मंजूर करून घेत या भागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडला आणि या रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे असे देखील उपमहापौर जंजाळ म्हणाले.

Displaying IMG_7607.JPG

यावेळी दत्ता लोकरे, बबलू कुमावत, गोर्डे भाऊ, ज्ञानेश्वर मगरे, सदाशिव जाधव, प्राध्यापक ढोरे सर ,मनोज थोरहत्ते,डॉ. अमोल शिंदे, सचिन नागलबोणे, विलास बोरुडे, सुधीर खराद, नितिन डुकरे, बजरंग आहेर, राजू गिरबोणे, प्रवीण मोहिते,  दुर्गादास रणनवरे, विनोद माने, निशांत वाघ, आकाश डोईफोडे, विकास कुबेर, स्वप्नील चंदने, अनिल समरीत, आनंद शिंदे, ताराचंद पारखे, आत्मेश पटेल, रोहित पवार, सुशील देशपांडे, रंजीत दाभाडे, सरदार पटेल, शफीक पटेल, इम्रान सय्यद, अभिषेक जाधव, शांतीलाल बन्सवाल, किशोर गायकवाड, सागर सोनवणे, भिकन पटेल, प्रशांत चाबुकस्वार, मोबीन पटेल, शेख बब्बु, पिंटू राजपुत, सनी गोरीयन आदींची उपस्थिती होती.