टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची निवड

औरंगाबाद,१२ जून /प्रतिनिधी:- सी.एस.एम.एस.एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये टाटा कॅन्सल्टंसी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) च्या ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या १० विद्यार्थ्यांची असिस्टंट सिस्टीम इंजिनिअरपदी निवड झाली असून त्यांना कंपनीतर्फे रूपये ३.४० लाखांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या निखिल वायकोस, शिवानी जाधव, आदिती पाटील, ऋषिकेश आवारे, शुभम कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या श्रीकांत मैराळ, राम लघाने, इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या श्वेता डहाके, नयन जाधव आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या आदित्य जाधव यांचा समावेश आहे. टी.सी.एस. ही भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असून क्लाऊड सर्व्हिसेस, आय. टी इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, बिजनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग, सायबर सेक्युरिटी, ऑटोमेशन इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. जगात जवळपास ४६ देशांमध्ये कंपनीचे वास्तव्य आहे.

कोरोना महामारीमुळे या वर्षीची संपूर्ण निवड प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली. निवड प्रक्रिया दोन स्तरांमध्ये पार पडली. पहिला राउंड म्हणजे ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट. ज्यामध्ये जनरल व टेक्निकल ऍप्टिट्यूड आणि कोडींग व प्रोग्रामिंग इत्यादींचा समावेश होता. तर दुसरा राउंड हा पर्सनल इंटरव्ह्यू चा होता. यामध्ये टेक्निकल इंटरव्ह्यू व एच.आर. इंटरव्ह्यू इत्यादींचा समावेश होता.

या ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि. रणजीत मुळे, सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास बी. शिंदे, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दीपक पवार, विभागप्रमुख डॉ. रामचंद्र चोपडे, डॉ. संदीप अभंग, प्रा. अभय मुदिराज, प्रा. देवेंद्र भुयार, प्रा. सोहेल अली, प्रा. बी.एस. देशमुख, प्रा. संजय कुलकर्णी, डॉ. अमित रावते, प्रा. सत्या प्रवीण, डॉ. अभिनव माने, प्रा. प्रवीणकुमार जाधव, श्री. हरदीपसिंग गिल यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या मुलाखतीच्या आयोजनासाठी डॉ. प्रशांत जाधव, प्रा. मनोज मते, प्रा. जगन्नाथ मोहिते, प्रा. अभिजीत गायकवाड, प्रा. गोपाळ चौधरी, प्रा. योगेश नागरगोजे, प्रा. नागेश ठाकरे, प्रा. अजिंक्य सालपे, प्रा. संघपाल चाबुकस्वार, प्रा. रवींद्र सुरासे, प्रा. युवराज नरवाडे, प्रा. सतीश मनाल, प्रा. केशव काळे आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.