लघुउद्दोगाचे प्रश्न सोडवणे यासाठी शासन कायमच कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

औरंगाबाद,५ जानेवारी  / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य हे उद्योगांच्या बाबतीत आघाडीवर असलेले राज्य असून नवनवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. राज्यात १२ लाख लघुउद्योग असून त्यात लाखो नागरिक काम करतात या उद्योगांमध्ये वाढ करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी शासन कायमच कटिबद्ध आहे. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या एक्स्पो मधून अनेक उद्योजकांनी आपली गुंतवणूक वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना लागेल ते सर्व सहकार्य करायला सरकार तयार असल्याचे यासमयी बोलताना सांगितले.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये औद्योगिकरणाचा वेग कमी आहे तो वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करू, राज्यात शेतीपूरक उद्योग उभे करणे तसेच जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील उद्योग आणि कौशल्य विकास विभागाकडून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. या एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांनी काही सूचना असल्यास त्यांची अंमलबजावणी करायला शासन तयार असल्याचे यासमयी बोलताना सांगितले.

आज ऑरिक सिटी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ चे उद्घाटन पार पडले. यावेळी, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे व सबंधित उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, फलोत्पादन तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, उद्योग विभागाचे सचिव डॉ.हर्षदीप कांबळे,खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार हरिभाऊ बागडे हेदेखील उपस्थित होते.