पोषण आहारामध्ये विविधता करण्याच्या मनपा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या सूचना

अन्नामृत फाउंडेशन प्रकल्पास मनपा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांची भेट

औरंगाबाद, ७ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत अन्नामृत फाउंडेशन प्रकल्पाला आज मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी  यांनी भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या उत्तम पोषणासाठी अन्नामृत फाउंडेशन च्या माध्यमातून शासन व समाज या दोहोंच्या मदतीने नियमीत  स्वच्छ गुणवत्ता, पूर्ण पोषण आहार पूरक आहार व.महिन्यातून एकदा पोषण आहारामध्ये पनीर / टोफु पनीर आधारित डिशेस वितरित केल्या जातात. त्याची प्रशासक महोदयांनी पाहणी केली व एक उत्तम प्रकल्प म्हणून नोंद घेतली.
पोषण आहारामध्ये विविधता व त्यासोबत संतुलित आहार, स्वच्छ हात धुणे , चांगल्या सवयी इत्यादी  बाबत स्वयंसेवकांच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये उपक्रम घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी संजीव सोनार ,अंकित काळे (संचालक काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज),राजन नाडकर्णी,कल्याण वाघमारे, डॉ. संतोष मद्रेवार,राजेश भारुका आदींची उपस्थित होती.