नागरिकांच्या सेवेसाठी “समाधान” हेल्पलाइनचे लोकार्पण

• मनपा संबंधित समस्येसाठी 155304 वर कॉल करून किंवा www.aurangabadmahapalika.org ह्या संकेस्थळावर जाऊन तक्रार नोंदवू शकता
• विहित काळात होईल तक्रार निवारण  

  • पालकमंत्री श्री संदीपान भुमरे यांचा हस्ते हेल्पलाइनचे लोकार्पण

औरंगाबाद, ७ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिकेचे अत्याधुनिक मदत कक्ष “समाधान” ह्याचे शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संदीपान भूमरे ह्यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले. औरंगाबाद महानगरपालिका द्वारे पुरवण्यात येणाऱ्या सेवेसंबंधित मदत हवी असल्यास नागरिक आता 155304 ह्या क्रमांकावर किंवा www.aurangabadmahapalika.org वर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात.

मनपा संबंधित प्रश्नांसाठी तक्रार निवारण व्यवस्थेचा आभावामुळे बरेच वेळ नागरिकांना मनपाच्या कार्यालयांपर्यंत यावे लागत असे. विशेष महिला व वृध्द व्यक्तींना हे खूप अवघड होत होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी ह्यांनी औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुविधेसाठी एक विशेष हेल्पलाइन व्यवस्था तयार करण्यासाठी आदेशित केले होते. त्यानुसार मागच्या दिढ महिन्यापासून हेल्पलाइन वर युद्ध पातळीवर कार्य सुरू होते. ह्यासाठी मनपा उपायुक्त संतोष टेंगळे ह्यांना नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे व औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली हेल्पलाइन संबंधित काम बघत आहेत.

शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री श्री संदीपान भूमरे ह्यांचा हस्ते औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या कार्यालयात “समाधान” हेल्पलाइन चे लोकार्पण करण्यात आले. ह्यावेळेस मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी व अन्य मनपा व स्मार्ट सिटी चे अधिकारी उपस्थित होते.

“समाधान” हेल्पलाइनचे कुशल संचालानाठी मनपा प्रशासक डॉ अभिजित चौधरी ह्यांचा मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांसोबत चर्चा करून जबाबदारी आणि तक्रार निवारण करण्याचे वेळ ठरवण्यात आले आहे. ह्यामध्ये अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, संतोष टेंगळे, नंदा गायकवाड, सोमनाथ जाधव, राहुल सूर्यवंशी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, उद्यान अधीक्षक विजय पाटील, मुख्य अग्निशामक अधिकरी आर के सुरे, शिक्षण अधिकारी संजीव सोनार व इतर अधिकाऱ्यांचे सहभाग लाभले.

“समाधान” हेल्पलाइनच्या माध्यमाने नागरिक विविध समस्या जसे की घंटा गाडी न येणे, पथदिवे बंद असणे, किंवा मोकाट कुत्र्यांचे त्रास ह्यांचा बद्दल तक्रार नोंदवू शकतात किंवा मालमत्ता कर व पाणी शुल्क भरण्या संबंधित मदत घेऊ शकतात. ही हेल्पलाइन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 1553050 वर किंवा ऑनलाइन www.aurangabadmahapalika.org वर कधीही नोंदवू शकतात. समाधान हेल्पलाइन औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल रूम मधून संचालित होणार आहे.

————————————————————————
तक्रार नोंद झाल्यापासून निवारण होईपर्यंत सर्व सिस्टीम ऑनलाइन
• 155304 वर कॉल करून किंवा ऑनलाइन www.aurangabadmahapalika.org वर तक्रार  केल्यानंतर ऑटोमॅटिक सिस्टीम द्वारे ती तक्रार संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला वर्ग करण्यात येईल
• नागरिकाला रेफरेन्स आय डी व संबंधित अधिकाऱ्याचे नाव सोबत एस एम एस येईल
• संबंधित अधिकाऱ्याने निहित वेळेत तक्रारीचे निवारण करावयाचे आहे नसल्यास ती तक्रार वरिष्ठ अधिकारी कडे जाईल आणि जर तक्रारीचे निवारण कोणत्या ही अधिकारी कडून झाले नाही तर ती मनपा आयुक्तांना वर्ग केली जाईल
• तक्रार नोंद झाल्यापासून ते निवारण झाल्यापर्यंत सर्व माहिती ऑनलाइन डेशबोर्ड वर आयुक्तांना उपलब्ध राहील.
• मनपा आयुक्त दर 15 दिवसाला मदत कक्षाचे आढावा घेतील.

—————————————————————————